राजस्थान: काळा रंग असल्याचे म्हणत बायकोने सोडले, नवऱ्याची कोर्टात धाव
राजस्थान मधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील एका व्यक्तीला बायकोने सोडले कारण त्याचा रंग काळा आहे. नवऱ्याने अस आरोप लावला आहे की, पत्नी त्याला म्हणाली तुझा रंग काळा असल्याने मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. याच प्रकरणावरुन आता नवऱ्याने कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या आधारावर राजस्थान पोलिसांनी पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Muslim Personal Law Board: हुंडा घ्याल तर लग्न नाही लावणार,मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय)
श्रीविजयनगर येथील वॉर्ड 6 मधील ही घटना असून सुमित नावाच्या व्यक्तीने कोर्टाच्या माध्यमातून बायकोच्या विरोधात छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुमित याचे लग्न 2019 मध्ये सुरत येथे झाले होते. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे. पोलिसात दाखल करण्यात आलेल्या गुन्हानुसार सुमित याने पत्नीच्या विरोधात मानसिक, आर्थिक आणि शारिरिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. त्याने असे ही म्हटले की, माझ्या काळ्या रंगावरुन बायकोने राहण्यास नकार दिला आहे.
सुमित याने पुढे असे म्हटले आहे की, जेव्हा त्याचे लग्न झाले त्यावेळी सासरच्या मंडळींनी त्याला हुंडा दिला नाही. सुरुवातीला सर्वकाही ठिक होते पण नंतर बायको रंगावरुन छळ करु लागली. बायकोने 50 हजार रुपये सुद्धा हडपल्याचा आरोप सुमितने लावला आहे. काही दिवसांपूर्वी सुमित याने बायकोच्या भावाच्या उपचारासाठी सुद्धा 50 रुपये दिले होते. परंतु ते आता परत देण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिला आहे.(Child Sexual Abuse: भारतात दररोज लैंगिक अत्याचार होत असलेल्या 4 मुलांना न्याय मिळत नाही; KSCF च्या अहवालात धक्कादायक खुलासा)
या व्यतिरिक्त सुमितला गेल्या महिन्याच्या 11 तारखेला बायकोचे वडील आणि तिचे दोन भाऊ घरी आले होते. त्यावेळी त्यांनी जेवणात गुंगीचे औषध मिसळून दिले आणि नंतर हाय पाय बांधून त्याला मारहाण सुद्धा केली होती. सुमित याच्या ओरडण्याने शेजारी सुद्धा धावत आले होते. याच दिवशी रात्री बायको 25 हजार रुपयांची रोकड आणि दागिने घेऊन घर सोडून निघून गेली.