Rafale Fighter Jets Land in India: राफेल लढावू विमान ताफ्याचे अंबाला एअरबेसवर लँडींग; भारताच्या लष्करी सामर्थ्यात वाढ

राफेल विमाने कशी हाताळायची याबाबत या वैमानिकांना आणि त्यांच्या क्रू मेंबर्सच्या टीमला सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. फ्रान्सकडून भारताला एकूण 36 राफेल लढावू विमाने मिळणार आहेत. त्याबाबतचा करार उभय देशांमध्ये 2016 मध्येच झाला आहे.दोन्ही देशांमध्ये 59 हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे.

Rafale Fighter Jets Land in India: राफेल लढावू विमान ताफ्याचे अंबाला एअरबेसवर लँडींग; भारताच्या लष्करी सामर्थ्यात वाढ
Rafale Fighter Jet. (Photo Credits: Twitter)

Rafale Fighter Jets Land in India: राफेल लढावू विमान (Rafale Fighter Aircraft) ताफ्याचे हरियाणा येथील अंबाला एअरबेस (Ambala Air Base) येथे लँडींग झाले. फ्रान्स येथे विशेष प्रशिक्षण घेतलेले भारतीय वैमानिक या विमानांसह भारतात दाखल झाले. या विमानांच्या आगमनामुळे भारतीय लष्करी शक्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारताच्या लष्करी सेवेत आणि जगभरातील एकूणच लष्करी सामग्रमध्ये राफेल लढावू विमानेही अद्ययावत मानली जातात. काही मनिटांपूर्वीच ही विमाने भारतीय हवाई हद्दीत दाखल झाली होती. सधारण 7 हजार किलोमीटरचे अंतर पार करत या विमानांनी भारतात प्रवेश केला.

राफेल विमाने कशी हाताळायची याबाबत या वैमानिकांना आणि त्यांच्या क्रू मेंबर्सच्या टीमला सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. फ्रान्सकडून भारताला एकूण 36 राफेल लढावू विमाने मिळणार आहेत. त्याबाबतचा करार उभय देशांमध्ये 2016 मध्येच झाला आहे.दोन्ही देशांमध्ये 59 हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. (हेही वाचा राफेल फायटर जेट्सचा अरबी समुद्राच्या हद्दीमध्ये प्रवेश होताच INS Kolkata सोबत संपर्क; ऐका हा खास Audio)

राफेल लढावू विमानांनी फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी उड्डाण भरले होते. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर या विमानांनी काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर या विमानांनी आज सकाळी पुन्हा उड्डाण भरले आणि ही विमाने भारतीय हवाई हद्दीत दाखल झाली. राफेल विमानांचा पहिल्या ताफ्यात एकूण पाच विमाने आहेत. यातील तीन विमाने सिंगल सीटर आहेत. तर दुसरी दोन डबल सिटर आहेत.

अतीशय वेगवान आणि शक्तीप्रधान अशा या विमानांनी यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यावर या ताफ्याने भारताकडे कूच केले होते. राफेल विमानांचे स्वागत करण्यासाठी भारतीय नौदलाची एक तुकडी पश्चिम अरबी समुद्रात तैनात होती. या ताफ्याने यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यावर भारतीय नौदलाच्या या INS कोलकात्ता या युद्धनौकेशी संपर्क साधला.

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2020 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).