आसाम: 'गोमांस हे राष्ट्रीय खाद्य आहे' असा दावा करणा-या आसामचे भाजप उमेदवार बनेंद्र कुमार मुशहरी यांच्या विरोधात पूर्वांचल हिंदू ऐक्य मंचकडून FIR दाखल

हे विधान या उमेदवाराने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले होते.

BJP | (File Image)

गोहत्या आणि गोमांस (Beef) यांच्या नेहमीच विरोधात असलेल्या भाजप पक्षाच्या एका उमेदवाराचे धक्कादायक विधान ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. आसाम मध्ये एका भाजप उमेदवाराने निवडणुकीदरम्यान 'गोमांस हे राष्ट्रीय खाद्य आहे' असा अजब दावा केला आहे. बनेंद्र कुमार मुशहरी (Banendra Kr Mushahary) असे या उमेदवाराचे नाव असून आसामच्या गौरीपुर निर्वाचन क्षेत्राचे ते भाजप उमेदवार आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर पूर्वांचल हिंदू ऐक्य मंचाने त्यांच्याविरोधात FIR नोंदवली आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, भाजपचे उमेदवार बनेंद्र कुमार मुशहरी यांनी गोमांसला राष्ट्रीय खाद्य असल्याचा दावा केल्यानंतर त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली. हे विधान या उमेदवाराने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले होते.हेदेखील वाचा- Tamil Nadu Assembly Elections 2021: विदेशी गायींचे दूध प्यायल्याने भारतीय महिलांनी फिगर गमावली; द्रमुक नेते Dindigul Leoni यांचे वादग्रस्त विधान

रिपोर्टनुसार, पूर्वांचल हिंदू ऐक्य मंचच्या सदस्यांनी गुवाहाटीजवळ दिसपुर पोलिस स्टेशनमध्ये भाजप नेता बनेंद्र कुमार मुशहरी यांच्याविरोधात FIR दाखल केली आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

काय होते प्रकरण?

भाजप उमेदवार बनेंद्र कुमार यांनी आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादम्यान मुस्लिम बहुल भागात सभेदरम्यान असा दावा केला होता, की "गोमांस हे राष्ट्रीय खाद्य आहे, बीफ जे आपण खातो, त्याला आपण कसे बॅन करु शकतो." त्यानंतर अनेकांनी या विधानावर आक्षेप केला होता.

दरम्यान तामिळनाडू विधानसभा निडणूक 2021 (Tamil Nadu Assembly Elections 2021) प्रचारादरम्यान द्रमुक (DMK) नेते दिंडिगल लिओनी ( Dindigul Leoni) यांनी असेच एक वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला आहे. दिंडिगल लिओनी यांनी भारतीय महिलांबाबत आक्षेपार्ह विधान (Dindigul Leoni Controversial Statement) केले.

'विदेशी गायींचे दूध प्यायल्यानेच आपल्याकडील महिलांनी फिगर गमावली आहे. त्यामुळे त्या जाड झाल्या आहेत' असे विधान दिंडिगल लिओनी यांनी केले आहे. आता दिंडिगल लिओनी यांच्या या विधानाची ऑडिओ, व्हिडिओ क्लिप जोरदार व्हायरल झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif