सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गेल्या नऊ महिन्यात 1.17 लाख कोटी रुपयांचा घोटाळा, RTI मधून धक्कादायक खुलासा

त्यानुसार आरटीआयने (RTI) जाहिर केलेल्या अहवालात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गेल्या नऊ महिन्यात (एप्रिल-डिसेंबर) 1.17 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (Public Sector Banks) बाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार आरटीआयने (RTI) जाहिर केलेल्या अहवालात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गेल्या नऊ महिन्यात (एप्रिल-डिसेंबर 2019) 1.17 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आरटीआयच्या या रिपोर्टमध्ये नऊ महिन्यात जवळजवळ 8 हजार 926 खोटी प्रकरणे उघडकीस आली आहेत. या फसवणूकीच्या जाळ्यात देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI) यांचा क्रमांक लागला आहे. आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी मीडियाला सांगितले की, आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी एका आरटीआयच्या उत्तरात ही माहिती दिली आहे.

एसबीआयच्या एका रिपोर्टच्या मते, डिसेंबर 2019 पर्यंत 4 हजार 769 फसवणूकीच्या प्रकरणात 30 हजार 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. 1.17 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याची रक्कम 26 टक्के आहे. या दरम्यान पंजाब नॅशनल बँकमध्ये एकूण 294 फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये 14 हजार 928.62 रोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. तसेच बँक ऑफ बडोदा मध्ये 250 प्रकरणे असून 11 हजार 166.19 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.(फक्त अडीच वर्षांत D-Mart ला 290% फायदा; राधाकिशन दमानी बनले देशातील सहावे श्रीमंत उद्योजक; अदानी, नेस्लेलाही टाकले मागे)

तर देशातील विविध बँकांमध्ये कोटीच्या घरात घोटाळे करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. तर कॅनरा बँक, युके बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेन्ट्रल बँक, इंडियन बँक आणि पंजाब अॅन्ड सिंध बँकेत एकूण 31 हजार 600.76 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. यामध्ये 1 हजार 867 प्रकरणे समोर आली आहेत.