येत्या 8 जानेवारीला बँक आणि वीमा कर्मचाऱ्यांची संपाची हाक
नव्या वर्षात बँक क्षेत्रातील प्रमुख युनियन यांनी संप पुकारणार असल्याचा इशारा दिला आहे. आयएनएस यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 8 जानेवारीला केंद्रीय ट्रेड युनियन द्वारे आयोजित संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे
नव्या वर्षात बँक क्षेत्रातील प्रमुख युनियन यांनी संप पुकारणार असल्याचा इशारा दिला आहे. आयएनएस यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 8 जानेवारीला केंद्रीय ट्रेड युनियन द्वारे आयोजित संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाच्या वरिष्ठांनी दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास त्याचा परिणाम ग्राहकांच्या महत्वाच्या कामावर होणार आहे.
एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, देशभरात सर्वसाधारण संपाला 10 केंद्रीय कामगार संघटना पाठिंबा देत आहेत. व्यंकटचलम यांच्या म्हणण्यानुसार हा संप केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात केला जाईल, ज्यामध्ये रोजगार सुरक्षा, नोकरीनिर्मिती आणि कामगार कायद्यांमधील दुरुस्ती रोखण्यासाठी संबंधित मागण्या केल्या जातील.
वेंकटाचलम म्हणाले की या संपात सामील झालेल्या बँकिंग क्षेत्राशी संबंधित प्रमुख संघटना एआयबीईए, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ आणि आयएनबीओसी असतील. . रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) कर्मचारीही संपामध्ये सामील होतील असा दावा व्यंकटचलम यांनी केला आहे. याशिवाय सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक (आरआरबी), भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि जनरल विमा क्षेत्रातील कर्मचार्यांनीही या संपाला पाठिंबा दर्शविला आहे.(बँकेच्या KYC फॉर्ममध्ये तुम्हाला धर्माचे नाव लिहावे लागण्याची शक्यता)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)