PM Narendra Modi Clicking Pics of Cheetah: पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनन कव्हर न काढता निकॉन कॅमेऱ्याने चित्त्यांची फोटोग्राफी?  जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

या वेळी हातातील कॅमेऱ्याने चित्त्यांचे फोटो काढतानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

The morphed pictures of PM Narenra Modi. (Photo credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांनी मध्य प्रदेशातील नामिबीयातून आणलेल्या चित्त्यांना (Namibian Cheetahs) मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) सोडले. या वेळी हातातील कॅमेऱ्याने चित्त्यांचे फोटो काढतानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, या फोटोवरुन पंतप्रधानांना सोशल मीडियावर ट्रोलर्सनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोलल्सचा दावा होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅमेऱ्याचे लेन्स कव्हर न काढताच फोटो काढत होते. विरोधक आणि ट्रोलर्सनी केलेल्या दाव्याबाबत आम्ही सत्यपडताळणी केली. या वेळी व्हायरल फोटोमागील वेगळेच सत्य सामोरे आल्याचे पाहायला मिळाले.

आम्ही केलेल्या तथ्यपडताळणीत प्रामुख्याने तृणमूल काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॉर्फ केलेली छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केल्याचे आढळून आले. या छायाचित्रांना दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, त्यांनी फोटो काढताना कॅमेऱ्याचे झाकणही काढले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मॉर्फ केलेले छायाचित्र शेअर करताना, टीएमसी खासदार जव्हार सरकार म्हणाले, 'देशातील आकडेवारी झाकून ठेवणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र, फोटो काढताना कॅमेऱ्याचे झाकण लावलेले असणे ही एक दूरदृष्टी आहे' टीएमसी व्यतिरिक्त, इतर अनेक नेटिझन्सनी देखील पंतप्रधान मोदींचे मॉर्फ केलेले फोटो सामायिक केले ज्यात कॅमेर्‍यावरील लेन्स दिसत आहेत. (हेही वाचा, PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं, पहा व्हिडीओ)

ट्विट

टीएमसी आणि नेटवरील ट्रोलर्सनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो फेक असल्याचे लक्षात येताच भाजपने याची तातडीने नोंद घेतली. भाजपने पंतप्रधान मोदींच्या मॉर्फ केलेल्या फोटोशॉप केलेल्या प्रतिमेवर तातडीने आक्षेप घेतला. तसेच, खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल टीएमसीवर टीका केली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या चित्रांमध्ये, निकॉन कॅमेऱ्यावर कॅननची लेन्स दिसू शकते, जी संपादीत केल्याचे स्पष्टपणे दिसते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif