PM Modi Received Cyprus Highest Honor: पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-III प्रदान
सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III देऊन सन्मानित केले.
PM Modi Received Cyprus Highest Honor: सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स (Nikos Christodoulides) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III (Grand Cross of the Order of Makarios-III) देऊन सन्मानित केले. सायप्रसच्या भूमीवरून पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जगाला भारताच्या वाढत्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. रविवारी सायप्रसच्या लिमासोल शहरात झालेल्या व्यवसाय गोलमेज परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्या उपस्थितीत ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, धोरणनिर्मितीतील स्थिरता, व्यावसायिक वातावरणात सुधारणा, डिजिटल क्रांती आणि पुढील पिढीतील सुधारणांमुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे. भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. (हेही वाचा - PM Modi to Visit Cyprus, Canada and Croatia: पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 19 जूनदरम्यान सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर; जाणून घ्या भेटींचे महत्व)
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान प्रदान -
#WATCH | Nicosia: President of Cyprus, Nikos Christodoulides awards Prime Minister Narendra Modi with Grand Cross of the Order of Makarios III, the highest honour in Cyprus.
(Video: ANI/DD) pic.twitter.com/a5eqebCyoR
— ANI (@ANI) June 16, 2025
सायप्रस द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर -
दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी सायप्रससोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या शक्यतांवर भर दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि सायप्रसमध्ये व्यापार, गुंतवणूक, डिजिटल पेमेंट, पर्यटन, संरक्षण, लॉजिस्टिक्स आणि स्टार्टअप्स यासारख्या क्षेत्रात सखोल सहकार्य होऊ शकते. भारताच्या डिजिटल क्रांतीचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. आज जगातील 50 टक्के डिजिटल व्यवहार भारतात होतात, ज्याचे श्रेय युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला जाते. या क्रमाने, NPCI इंटरनॅशनल आणि युरोबँक सायप्रस यांच्यात एक करार झाला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील सीमापार पेमेंट शक्य होईल, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2025 02:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

