IPL Auction 2025 Live

Land for Jobs Scam: गरोदर पत्नी रुग्णालयात, तेजस्वी यादव CBI च्या चौकशीला गैरहजर

उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने राजश्री यादव बेशुद्ध झाल्या अशी सूत्रांची माहिती आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Tejashwi Yadav | (Photo Credits: Facebook)

जमिनीच्या बदल्यात नोकरी (Land for Jobs Scam) दिल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय (ED) राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा यांच्या लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने 24 ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीत ईडीने 70 लाख रूपयांची रक्कम, दीड किलो सोन्याचे दागिने आणि परकीय चलन जप्त केलं आहे. जमीन-नोकरी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयनं यापूर्वी लालू यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी (Rabari Devi) यांची चौकशी केली होती. तर आता सीबीआयनं आपला मोर्चा लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याकडे वळवला आहे.  (BRS Leader, K Kavitha: के कविता यांच्या ईडी चौकशी पूर्वी तेलंगणात झळकले 'Bye Bye Modi' चे पोष्टर्स)

या प्रकरणी सीबीआयनं तेजस्वी यादवला दुसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात बोलावण्यात आलं होते. पंरतू गर्भवती पत्नीला रुग्णालयात भर्ती करण्यात आल्यामुळे ते आज सीबीआईच्या चौकशीला गैरहजर राहिले. ईडीने लालूप्रसाद यादव यांच्या तीन मुलींसह, सध्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरावरही छापा टाकला. ईडीने तब्बल 12 तास सर्वांची चौकशी केली. दरम्यान, ही चौकशी सुरु असतानाच तेजस्वी यादव यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध पडली. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने राजश्री यादव बेशुद्ध झाल्या अशी सूत्रांची माहिती आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.