Mehul Choksi PNB Scam: पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोकसी याला भारतात खरोखरच आणता येईल?

मेहुल चोकसी याला बेटांचा देश (Island Nation) डोमिनिका (Dominica) येथे बेकायदेशीररित्या प्रवेश करताना अटक झाली. त्यामुळे मेहुल चोकसी नेमका आहे तरी कुठे याचा तरी उलघडा झाला. परंतू, या मेहुल चोकसी याला खरोखरच भारतात आणता येऊ शकेल काय? याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mehul Choksi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंजाब नॅशनल बँक घाटोळा (PNB Scam) प्रकरणाती मुख्य आरोपी मेहुल चोकसी (Mehul Choksi) याला बेटांचा देश (Island Nation) डोमिनिका (Dominica) येथे बेकायदेशीररित्या प्रवेश करताना अटक झाली. त्यामुळे मेहुल चोकसी नेमका आहे तरी कुठे याचा तरी उलघडा झाला. परंतू, या मेहुल चोकसी याला खरोखरच भारतात आणता येऊ शकेल काय? याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंतरराष्ट्रीय काद्यांचे अभ्यासक असलेल्या अभ्यासकांनी म्हटले आहे की, मेहुल चोकसी याला केवळ डोमेनिका येथून एटीगुआ आणि बारबुडा येथे परत पाठवले जाऊ शकते. कारण तो कॅरीबीयन द्वीप (Caribbean Islands) राष्ट्र समुहाचा नागरिक आहे. भारताचा नव्हे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डोमिनिकाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, 62 वर्षी मेहुल चोकसी याला गुरुवारी (27 मे) बेकायदेशिररित्या देशात प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, डोमिनिका कॅरेबेई राष्ट्र एंटीगुआच्या संपर्ता असून, सातत्याने शोध घेतला जात आहे की, मोहुल चोकसी याच्या नागरिकत्वाचे वास्तव काय आहे. तसेच, त्याला पुन्हा एंटीगुआला परत पाठवले जाईल का. चोकसी याला पकडण्यासाठी इंटरपोलचा अलर्ट आगोदरपासूच जारी आहे. (हेही वाचा, PNB Scam मधील आरोपी 'मेहुल चोकसी'चं लवकरच भारतामध्ये प्रत्यार्पण होण्याची शक्यता; Antigua देशाचं नागरिकत्त्व होणार रद्द)

मेहुल चोकसी याचा वकील विजय अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, मेहुल चोकसी हे आपल्या स्वच्छेने डोमिनिका येथ पोहोचले नाहीत. ते डोमिनिकाला जाणाऱ्या रस्त्यांमध्ये काही कारणाने रस्ता भटकले. याशिवाय पुढे बोलताना अग्रवाल यांनी म्हटले की, भारताच्या प्रस्तावाविरोधात एंटीगुआ उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे माझ्या माहितीनुसार चोकसी यांना केळव एंटीगुआ येथेच परत पाठवले जाईल. त्यांना भारतात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

मेहुल चोकसी याला पकडले गेले तेव्हा तो एंटीगुआ येथून क्युबाला जाण्याच्या प्रयत्नात होता. क्युबा येथे तो भारत सोडल्यानंतर 2018 पासून राहात आहे. त्याने कथित रुपात एंटीगुआ सोडले आणि शेजारी देशाची एक नाव पकडली. त्यातून तो डोमिनिका येथे गेला. त्याच्या विरोधात इंटरपोल लुकआऊट सर्क्युलर होते. त्यामुळे या सर्क्युलरच्या आधारे पोलिसांनी त्याला डोमिनिकाच्या समुद्रकिनारी पकडले.

मेहुल चोकसी याच्यावर आरोप आहे की, त्याने आपला भाचा नीरव मोदी याच्यासोबत खोटी कागदपत्रे मिळवून पंजाब नॅशनल बँकेला 13,500 कोटी रुपयांना फसवले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून या घोटाळ्याची भारतीय उच्च संस्थांकडून चौकशीही सुरु आहे. दुसऱ्या बाजूला लंडन येथील कारागृहात नीरव मोदी भारतातील आपल्या प्रत्यार्पणाविरुद्धची लढाई लढतो आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now