Global Leader With Highest Approval Rating: जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत PM Narendra Modi अव्वलस्थानी कायम - Morning Consult
2024 च्या लोकसभा निवडणूका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. त्यापूर्वी मोदींची अशी लोकप्रियता भाजपा च्या पथ्यावर पडण्याची चिन्हं आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये पुन्हा अव्वल ठरले आहेत. बिझनेस इंटेलिजंस कंपनी Morning Consult च्या सर्व्हेमध्ये यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. अमेरिकेतील या कन्सल्टंसी फर्म ने अप्रुव्हल रेटिंग ट्रॅकर नुसार 76% लोकांची पसंती नरेंद्र मोदींना असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या नेतृत्त्वावर लोकांनी विश्वास ठेवल्याच म्हटलं आहे. खास बात म्हणजे मोदींच्या जवळपासही अन्य कोणता जागतिक नेता नाही.
सर्व्हेनुसार, 76% लोकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन आहे. तर 18% लोकांनी त्यांच्या विरोधात मत मांडलं आहे. सर्वेनुसार दुसर्या स्थानी मेक्सिकोचे अध्यक्ष Andres Manuel Lopez Obrador आहे. त्यांना 66% अप्रुव्हल रेटिंग मिळाले आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना 37% अप्रुव्हल रेटिंग मिळाले असून ते आठव्या स्थानी आहे. या सर्व्हे मध्ये इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांना 41% रेटिंग मिळाले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना 31 टक्के, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 25 टक्के आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना केवळ 24 टक्के मान्यता मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे भारतात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या हिंदी हार्टलँड राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने तीन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचंड विजय मिळवल्यानंतर ही रेटिंग्स आली आहेत.
स्वित्झर्लंड, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रप्रमुखांनीही पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. याआधीच्या रेटिंगमध्येही पीएम मोदी पहिल्या क्रमांकावर होते. त्यांनी आपलं स्थान कायम ठेवलं आहे. 'Abundance in Millets': पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेल्या गाण्याला मिळालं 2024 Grammy Awards साठी नामांकन .
2024 च्या लोकसभा निवडणूका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. त्यापूर्वी मोदींची अशी लोकप्रियता भाजपा च्या पथ्यावर पडण्याची चिन्हं आहेत. मोदींनी काही दिवसांपूर्वीच यूएई मध्ये झालेल्या Conference of Parties-28 (COP28) Climate Action Summit मध्ये सहभाग घेतला होता.
पीएम मोदी म्हणाले की, हवामान बदलाचा सामना करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून Nationally Determined Contribution (NDC) पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या काही देशांपैकी भारत आहे आणि 2028 मध्ये हा देश COP33 चे आयोजन करेल असा प्रस्ताव दिला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)