PM Narendra Modi (Photo Credits: Twitter/@NarendraModi)

देशातील कोविड-19 वरील लसींचा (Covid-19 Vaccine) आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या तीन शहरांना भेट देणार आहेत. अहमदाबाद (Ahmedabad), हैदराबाद (Hyderabad) आणि पुणे (Pune) येथे भेट देऊन मोदी लसीच्या विकासाचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संकटाविरुद्धच्या लढाईमध्ये आपण आता निर्णयाक टप्प्यावर पोहचलो आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी शास्त्रज्ञांना भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच लसीचा विकास, वितरण आणि तयारी यासंदर्भात आढावा घेणार आहेत. (COVID-19 Vaccine Update: कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारला 250 रुपयांना देणार- अदर पूनावाला)

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीचा विकास आणि निर्मिती प्रक्रीया प्रत्यक्ष पाहणार आहेत. यासाठी ते अहमदाबादमधील Zydus Biotech Park, हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) येथे भेट देणार आहेत. (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड-19 लसीच्या वितरणाचा आढावा; जलद पुरवठ्यासाठी पूर्वतयारीकडे विशेष लक्ष)

PMO India Tweet:

दरम्यान, भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 92,66,706 वर पोहचला आहे. त्यापैकी 86,79,138 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 4,52,344 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 1,35,223 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी गृहमंत्रालयाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. तसंच नागरिकांनाही नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, कोविड-19 चा धोका पूर्णपणे टाळण्यासाठी लस मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे लसीच्या विकासाचा आढावा पंतप्रधान मोदी उद्या घेणार आहेत.