PM Narendra Modi On Farm Law: केंद्र सरकार कडून 'सुधारित 3 कृषी कायदे' मागे, आंदोलकांनी मागे फिरण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

आज मोदींनी त्यांनाही मागे परतण्याचं आवाहन करत गुरू पुरब पर्व आप्तांसोबत साजरं करण्याचं आवाहन केले आहे.

PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ANI

मागील 26 नोव्हेंबर पासून भारतातील शेतकरी बांधव कृषी कायद्या (Farm Laws) विरूद्ध आंदोलन करत होते. एका अभूतपूर्व आंदोलनाचा आज यशस्वी शेवट झाला आहे. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरू नानक जयंतीचं (Guru Nanak Jayanti) औचित्य साधत कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. तसेच आंदोलक शेतकर्‍यांनी आपापल्या घरी परतून आप्तांसोबत गुरू परब पर्व साजरं करावं असे आवाहन केले आहे. दरम्यान कायदे मागे घेण्याची प्रक्रिया येत्या हिवाळी संसदीय अधिवेशनात पूर्ण केली जाणार असल्याचेही म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना दिलेल्या माहितीमध्ये,' प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण काहींना देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांपैकीच एका वर्गाने विरोध केला आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही. असे ते म्हणाले. पण आता अखेर आम्ही हा निर्णय मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. नक्की वाचा: Farm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या .

केंद्र सरकार कडून शेतकर्‍यांना दिलेल्या ऑफर मध्ये ते दीड वर्ष हे कृषी कायदे स्थगित करू असं म्हटलं होतं. पण आता अखेर सरकार बॅकफूट वर गेले असून कृषी कायदे रद्द करत असल्याचे म्हटलं आहे. कृषी क्षेत्रासाठी सरकारचं बजेट पाचपट वाढवलं आहे. देशात प्रत्येक वर्षी सव्वालाख कोटी रुपये कृषी क्षेत्रावर वापरले जात आहेत. छोट्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी एफपीओ वर काम सुरु आहे. 10 हजार एफएपीओ निर्माण करत आहोत.