PM Narendra Modi यांच्याकडून Ayushman Bharat Digital Mission, Health ID प्रत्येक नागरिकासाठी लॉन्च

एनएचए आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करत असताना पीएम-डीएचएमचा देशव्यापी प्रारंभ होत आहे.

PM MODI| PC: Twitter/ ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (27 सप्टेंबर 2021) भारतामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुषमान भारत डिजिटल मिशनचा (Ayushman Bharat Digital Mission) शुभारंभ केला आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या प्रायोगिक प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट, 2020 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केली होती. सध्या अंदमान निकोबार, चंदिगड, दादरा नगर हवेली, दीव- दमण, लडाख, लक्षद्वीप आणि पॉंडेचेरी सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम-डीएचएम प्रायोगिक टप्प्यात लागू केले जात आहे.

एनएचए आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करत असताना पीएम-डीएचएमचा देशव्यापी प्रारंभ होत आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय देखील उपस्थित होते. नक्की वाचा: National Digital Health Mission: 74 व्या स्वातंत्र्यदिनी भारतात सुरू झालेल्या 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' ची जाणून घ्या वैशिष्ट्य!

आयुषमान भारत डिजिटल मिशन काय आहे?

जन धन, आधार आणि मोबाईल (जेएएम) आणि सरकारच्या इतर डिजिटल उपक्रमांद्वारे रचलेल्या पायावर आधारित, पीएम-डीएचएम व्यापक डेटा, माहिती आणि पायाभूत सेवांच्या तरतुदीद्वारे एक वेगवान ऑनलाइन मंच तयार करेल आणि आरोग्य-संबंधित वैयक्तिक माहितीची सुरक्षा, गोपनीयता आणि खासगीपणा सुनिश्चित करताना खुल्या, आंतर परिचालन , मानकांवर आधारित डिजिटल प्रणालींचा योग्य वापर करेल. मिशन त्यांच्या संमतीने नागरिकांच्या आरोग्य नोंदींमध्ये प्रवेश आणि देवाणघेवाण सक्षम करेल.

पीएम-डीएचएमच्या मुख्य घटकांमध्ये प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ओळखपत्राचा समावेश आहे जे त्यांचे आरोग्य खाते म्हणून देखील काम करेल आणि त्याच्याशी वैयक्तिक आरोग्य नोंदी जोडल्या जाऊ शकतात आणि मोबाईल ऍप्लिकेशनचं मदतीने पाहिल्या जाऊ शकतात. हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (एचपीआर) आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्रीज (एचएफआर) हे आधुनिक आणि पारंपारिक औषध पद्धतीच्या सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांचे केंद्र म्हणून काम करतील. यामुळे डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.

मिशनचा एक भाग म्हणून तयार केलेले पीएम-डीएचएम सँडबॉक्स हे तंत्रज्ञान आणि उत्पादन चाचणीसाठी एक चौकट म्हणून काम करेल जे जे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेचा भाग बनू इच्छिणाऱ्या खाजगी कंपन्यां आणि संघटनांना मदत करेल. ते आरोग्य माहिती प्रदाते किंवा आरोग्य माहिती वापरकर्ता बनतील किंवा पीएम-डीएचएमशी कार्यक्षमतेने जोडले जातील.

हे मिशन डिजिटल आरोग्य परिसंस्थेत आंतर परिचालन क्षमता निर्माण करेल, ज्याप्रमाणे पेमेंटमध्ये क्रांतिकारी बदल करण्यात युनिफाइड पेमेंट इंटरफेसने भूमिका बजावली होती. आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्यापासून नागरिक केवळ एक क्लिक दूर असतील.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन मध्यमवर्ग आणि गरीब वर्गातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा उचलणार आहेत. अशा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. आयुष्मान भारत टेक्नॉलॉजीच्या मदतीने आता देशभरातील हॉस्पिटल जोडली जाणार आहेत.

(PNBS च्या इन्पूट्स सह)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now