PM Modi To Visit Russia: पंतप्रधान मोदी 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान रशियाला भेट देणार; BRICS परिषदेत होणार सहभागी
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कझान येथे होणाऱ्या 16 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून 22 ते 23 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियाच्या दौऱ्यावर असतील.
PM Modi To Visit Russia: ब्रिक्स परिषदेत (BRICS Summit 2024) सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi) रशिया (Russia) ला जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कझान येथे होणाऱ्या 16 व्या सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून 22 ते 23 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियाच्या दौऱ्यावर असतील.
भेटीदरम्यान, पंतप्रधान कझानमध्ये त्यांच्या समकक्ष आणि BRICS सदस्य देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) एका निवेदनात म्हटले आहे. 'समान जागतिक विकास आणि सुरक्षेसाठी बहुपक्षीयतेला बळकट करणे', ही या वर्षीच्या शिखर परिषदेची थीम आहे. (हेही वाचा -BRICS Summit 2023: PM Modi यांनी ब्रिक्स समिट मध्ये तिरंग्याप्रति दाखवलेल्या सन्मानाच्या या कृतीने South African President Cyril Ramaphosa देखील प्रभावित; सोशल मीडीयातही व्हिडिओ वायरल (Watch Video))
रशिया यंदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. सौदी अरेबिया, इराण, इथियोपिया, इजिप्त, अर्जेंटिना आणि संयुक्त अरब अमिराती हे या परिषदेत सहभागी झालेले नवीन सदस्य राष्ट्र आहेत. (हेही वाचा - BRICS 2023: PM मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात 'या' विषयी झाली चर्चा (Watch Video))
पंतप्रधान मोदी 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान रशियाला भेट देणार -
यापूर्वी 8 जुलै रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांसाठी रशियाला गेले होते. येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल देऊन सन्मानित केले होते. यावर पीएम मोदींनी पुतीन यांचे आभार मानत हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे म्हटले होते.