BRICS Summit 2023: PM Modi यांनी ब्रिक्स समिट मध्ये तिरंग्याप्रति दाखवलेल्या सन्मानाच्या या कृतीने South African President Cyril Ramaphosa देखील प्रभावित; सोशल मीडीयातही व्हिडिओ वायरल (Watch Video)

जमिनीवर ठेवलेला तिरंगा पाहून मोदींनी तो लगेच झुकून खिशात ठेवला. त्यांच्या या कृतीचं तातडीने अनुकरण साऊथ आफ्रिकेच्या अध्यक्षांनीही केले.

BRICS Summit 2023: PM Modi यांनी ब्रिक्स समिट मध्ये तिरंग्याप्रति दाखवलेल्या सन्मानाच्या या कृतीने South African President Cyril Ramaphosa देखील प्रभावित; सोशल मीडीयातही व्हिडिओ वायरल (Watch Video)
PM Modi | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या BRICS Summit मध्ये सहभागी होण्यासाठी साऊथ आफ्रिकेमध्ये आहेत. यावेळी एका कार्यक्रमात नेत्यांना उभं राहण्यासाठी त्यांचं मार्किंग झेंड्यांवरून दाखवण्यात आलं होतं. जमिनीवर प्रत्येक देशाचे झेंडे  होते. मोदी जेव्हा स्टेजवर चढले तेव्हा त्यांनी तिरंगा उचलून खिशात ठेवला. त्यांच्या या कृतीचं अनुकरण त्यांंच्या सोबत असलेल्या South African President Cyril Ramaphosa यांनीही केले. खाली झुकून त्यांनी झेंडा उचलला आणि जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे दिला. सोशल मीडीयात मोदींच्या या कृतीचं कौतुक होत आहे. तसेच हा व्हिडिओ झपाट्याने शेअरही केला जात आहे.

पहा व्हीडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2023 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).