PM Modi Launches The Platform For Transparent Taxation- Honouring The Honest: टॅक्स भरणा-यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विशेष घोषणा; सांगितले टॅक्स सिस्टम फेसलेस आणि Taxpayers Charter आजपासून होणार लागू

PM Narendra Modi | Photo Credits: Twiiter/ ANI

सर्व देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (PM Narendra Modi) Transparent Taxation- Honouring The Honest या कार्यक्रमात मोदींनी टॅक्स भरणा-यासांठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. प्रामाणिकपणे टॅक्स भरणा-या लोकांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यासाठी करप्रणाली मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आजपासून टॅक्स सिस्टम फेसलेस आणि Taxpayers Charter लागू करण्याची गोषणा केली. यासोबत करप्रणाली संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना लोकांशी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'देशात सुरु असलेला Structural Reforms एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. यासाठी 21 व्या शतकात कर प्रणातील काही नवीन बदल करण्यासाठी हा लोकार्पण सोहळा आज करण्यात आला.' प्रामाणिक करदाता राष्ट्र निर्मितीत मोठी भूमिका बजावत असतो. त्यामुळे करदात्याचे जीवन सोपे झाले तर देशाचा विकास होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी Transparent Taxation लॉन्चिंग कार्यक्रमात म्हणाले.

हेदेखील वाचा- भारतातील कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पहिल्या 72 तासांत रूग्णाचं निदान करण्यावर भर द्या; PM नरेंद्र मोदींच्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सूचना

पंतप्रधान नोदी असेही म्हणाले की, या प्लेटफॉर्म मध्ये फेसलेस असेसमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टर सारखे मोठे रिफॉर्म्स आहेत. फेसलेस असेसमेंट आणि टॅक्सपेयर्स चार्टर आजपासून लागू होतील.

यातील फेसलेस अपील सुविधा 25 डिसेंबरला म्हणजेच दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनादिवशी संपूर्ण देशभरातील नागरिकांसाठी उपलब्ध केली जाईल. आता जरी चॅक्स सिस्टम फेसलेस होत असला तरीही, करदात्यांना यात विश्वासार्हता वाटेल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now