Paytm Invest 100 Crores in Gift City: पेटीएम गिफ्ट सिटीमध्ये करणार 100 कोटी रुपयांची गुंतवणूक
पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications Limited (OCL) गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT City) मध्ये 100 कोटी रुपयांची गूंतवणूक करणार आहे. पेटीएम (Paytm) ही भारतातील आघाडीची पेमेंट आणि वित्तीय सेवा संस्था QR पेमेंट्स आणि मोबाइल व्यवहारांसारख्या नवकल्पनांसाठी प्रसिद्ध आहे.
पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications Limited (OCL) गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT City) मध्ये 100 कोटी रुपयांची गूंतवणूक करणार आहे. पेटीएम (Paytm) ही भारतातील आघाडीची पेमेंट आणि वित्तीय सेवा संस्था QR पेमेंट्स आणि मोबाइल व्यवहारांसारख्या नवकल्पनांसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने ही घोषणा व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 च्या काहीच दिवस आगोदर केली आहे. जगभरातील आर्थिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी आपली वचनबद्धता असल्याचे सांगत कंपनीने ही गुंतवणूक केल्याचे म्हटले आहे. देशांतर्गत बाजाराच्या पलीकडे आपला विस्तार वाढवण्याच्या पेटीएमच्या आकांक्षेतून हा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आवश्यक मंजुरी मिळेपर्यंत ही गुंतवणूक कालांतराने टप्प्याटप्प्याने केली जाईल.
पेटीएमने विश्वास व्यक्त केला आहे की, GIFT City देशाच्या सीमा पार करुन एक इनोव्हेशन हब म्हणून ओळख निर्माण करेन. जे पेटीएमच्या जागतिक आकांक्षांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरु शकेन. नवीन उपक्रमातील आपल्या सिद्ध कौशल्याचा लाभ घेत, भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या जागतिक वापरकर्त्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाची पूर्तता करण्याचे Paytm चे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांव्यतिरिक्त, पेटीएम GIFT सिटीमध्ये एक विकास केंद्र स्थापन करणार आहे. हे केंद्र केवळ रोजगाराच्या संधीच निर्माण करणार नाही तर जागतिक दर्जाची आर्थिक उत्पादने आणि सेवांचा संच तयार करण्यावर भर देणारे गृह अभियंते देखील तयार करतील, असे कंपनीने म्हटले आहे. (हेही वाचा, Paytm Layoffs: पेटीएममध्ये पुन्हा कर्मचारी कपात; 1 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ)
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी GIFT सिटीच्या जागतिक आर्थिक केंद्राच्या क्षमतेबद्दल उत्साह व्यक्त करत म्हटले की, GIFT City मधील धोरणात्मक गुंतवणूक कृत्रिम बुद्धिमत्ता, सीमापार संवाद आणि पेमेंट तंत्रज्ञान पायाभूत जमीन तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवते. ही एक जागतिक संधी आहे. जागतिक स्तरावर जलद, विश्वासार्ह आणि किफायतशीर उपाय वितरित करण्याच्या दृष्टीकोनावरही त्यांनी प्रकाश टाकला. विदेशी गुंतवणूकदारांना परकीय चलन खाती राखण्यासाठी आवश्यकता लवचिकता प्रदान करून, सीमापार घडामोडींसाठी GIFT सिटी हे दीपस्तंभ म्हणून ही गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. पेटीएमने या गुंतवणुकीचा उपयोग एक समर्पित विकास केंद्र तयार करण्यासाठी केला आहे आणि त्याचा तंत्रज्ञानाचा ठसा आणखी वाढवला आहे, असेही ते म्हणाले. सध्या गिफ्ट सिटी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हेसुद्धाय व्हायब्रंट गुजरातवर बारीक लक्ष ठेऊन आहेत, अशी देशात चर्चा असते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)