Nupur Sharma Row: प्रेषित पैगंबर मोहम्मद टिप्पणी प्रकरणी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य आणि मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना कारवाई करण्याचे आणि अटक करण्याचे निर्देश देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
भाजपाच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma Row) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य आणि मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना कारवाई करण्याचे आणि अटक करण्याचे निर्देश देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्ते अधिवक्ता अबू सोहेल यांना सांगितले की त्यांची याचिका निरुपद्रवी दिसत आहे परंतु त्याचे दूरगामी परिणाम आहेत. त्यानंतर सोहेलने आपली याचिका मागे घेतली.
भारताचे सरन्यायाधीश यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्ते अधिवक्ता अबू सोहेल यांना सांगितले की त्यांची याचिका निरुपद्रवी दिसत आहे परंतु त्याचे दूरगामी परिणाम आहेत. त्यानंतर सोहेलने आपली याचिका मागे घेतली.
तक्रार करूनही शर्मा यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करत याचिकाकर्त्यांच्या वकिलाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. याचिकेत म्हटले आहे की, नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद आणि मुस्लिम समुदयाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. त्यामुळे त्याचे वक्तव्य घटनेच्या स्वतंत्र, विश्वासार्ह आणि निःपक्षपाती तापास करण्यासाठी त्यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत , अशी मागणी या याचिकेत केली होती. या याचिकेत म्हटले होते की, शर्मा यांचे विधान संविधानाच्या कलम 14, 15, 21, 26 आणि 29 आणि इतर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे.
शर्मा यांच्या शब्दांमुळे देशात आणि जगभरात प्रचंड अशांतता आणि गोंधळ माजला आणि आपल्या महान राष्ट्राची प्रतिमा कलंकित झाली, याचिकाकर्त्याचे वकील म्हणाले. शर्मा यांच्या वक्तव्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांनाच धक्का बसला आहे, असा दावाही याचिकाकर्त्याच्य वकिलाने केला.