Nupur Sharma Prophet Row: नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरुन पश्चिम बंगालमध्ये वाद; आंदोलकांकडून दगडफेक, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाताला लागूनच असलेल्या हावडा (Howrah) येथील पंचला बाजारमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले

West Bengal | (Photo Credit - Twitter/ANI)

भाजपच्य निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद (Nupur Sharma Prophet Row) देशभर उमटत आहेत. पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाताला लागूनच असलेल्या हावडा (Howrah) येथील पंचला बाजारमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांमध्ये आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. आंदोलकांमध्ये असलेल्या समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मामारा केला. या आधीही या ठिकाणी नुपुर शर्मा आणि भाजपचे निलंबीत नेते नवीन कुमार जिंदल यांनी दिलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात जोरदार आंदोलन झाले होते.

दरम्यान, आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिसरात शांतता निर्माण करण्यासाठी प्रशासनाने 15 जून 2022 पर्यंत शहरात तीन किंवा त्याहून अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास बंदी घातली आहे. एक दिवस आगोदरच म्हणजे (शुक्रवार, 10 जून) इथे समाजकंटकांनी दगडफेक केली होती. हवाडा जिल्ह्यातिल वेगवेगळ्या ठिकाणी रस्तेवाहतूक आणि रेल्वेही रोखण्याचा काहींनी प्रयत्न केला. (हेही वाचा, Nupur Sharma: भाजपमधून निलंबित नुपूर शर्मा यांनी दिले विधान, पक्षाने दिलेल्या निर्णयाचा करते आदर)

ट्विट

राज्य सरकारने तातडीने महत्त्वाची पावले उचलत हावडा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी इंटरनेट सेवा स्थगित केली. अधिकाऱ्यांनी म्हटले की, सध्यास्थिती परिस्थिती नियंत्रणात आहे. आंदोलकांनी धूलागड, पंचला आणि उलबेरिया येथे पोलिसांसोबत झटापट केली. राष्ट्रीय राज्यमार्ग सहावर असलेली नाकाबंदी उठवताना हा प्रकार घडला. नुपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांना अटक करण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे.