Uma Maheshwari Death: एन टी रामाराव यांच्या कन्या कंथामनेनी उमा माहेश्वरी यांची आत्महत्या, गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सांगितले जात आहे की, पाठिमागील काही वर्षांपासून त्या नैराश्य आणि आरोग्यासंबंधी समस्यांशी सामना करत होत्या.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव (NT Rama Rao) यांच्या कन्या उमा माहेश्वरी (Uma Maheshwari) या आपल्याच घरात मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सांगितले जात आहे की, पाठिमागील काही वर्षांपासून त्या नैराश्य आणि आरोग्यासंबंधी समस्यांशी सामना करत होत्या. प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, उमा माहेश्वरी यांचा मृतदेह हैदराबाद येथली घरात पंख्याला लटकत्या अवस्थेत आढळून आला. कंथामनेनी उमा माहेश्वरी (Kanthamaneni Uma Maheshwari) असे त्यांचे पूर्ण नाव आहे.
उमा माहेश्वरी यांच्या यांच्या मृत्यूबाबत माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यांचा मृतदेह हैदराबाद येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सीआरपीसी कायदा कलम 174क अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहेत. (हेही वाचा, तेलुगू देशम पार्टी सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू यांना पूत्र नारा लोकेश यांच्यासोबत नजरकैद)
तेलुगु देशम पक्षाचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रामाराव यांच्या कन्या उमा माहेश्वरी हैदराबाद येथील जुबली येथील डोंगरी परिसरात असलेल्या घरात मृत आढळून आल्या. पोलीस कमिश्नर सीव्ही आनंद यांनी म्हटले की, असे दिसते आहे की, त्यांनी आत्महत्या केली असावी. मात्र, त्यांच्या घरात कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळाली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे.
उमा माहेश्वरी या एनटी रामाराव यांच्या 12 मुलांपैकी सर्वात छोट्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेता दग्गुबाती पुरंदरेश्वरी आणि नारा भुवनेश्वरी, टीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी या त्यांच्या बहिणी आहेत. पोलिसांनी म्हटले की, चंद्रबाबू नायडू, त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि कुटुंबीयातील इतर सदस्य माहेश्वरी यांच्या घरी पोहोचले आहेत.