अनंतनाग येथे अजित डोवाल यांचा दौरा, नागरिकांसोबत साधला संवाद
तर गेल्या दोन दिवसांपूर्वी डोवाल शोपिया येथे जाऊन आल्यानंतर आज अनंतनाग (Anantnag) येथे दौऱ्यावर आले आहेत.
कलम 370 हटवल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल (Ajit Doval) जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) दौऱ्यावर आले आहेत. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी डोवाल शोपिया येथे जाऊन आल्यानंतर आज अनंतनाग (Anantnag) येथे दौऱ्यावर आले आहेत. अनंतनाग येथील एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डोवाल तेथील रस्त्यांवर फिरताना दिसले. दरम्यान त्यांची भेट एका मेंढपालासोबत झाली. या व्यक्तीसोबत डोवाल यांनी बराच वेळ संवाद साधला. तर शोपिया येथे गेले असता डोवाल रस्त्यांवरील नागरिकांसोबत जेवण करताना आणि बोलताना दिसून आले होते.
जम्मू-कश्मीर येथे शांतता कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण तयारी करत आहे. त्याचसोबत अजित डोवाल हे दहशतवादी सक्रीय असलेल्या भागात जाऊन तेथील नागरिकांसोबत बातचीत करताना सध्या दिसून येत आहेत. येथील नागरिकांना भावी काळात उत्तम आयुष्य जगता येईल याचे आश्वासन देत आहेत. अनंतनाग हे जम्मू-कश्मीर मधील तीसरे सर्वात मोठे शहर आहे.(जम्मू-कश्मीर मधून कलम 144 रद्द केल्यानंतर शाळा-महाविद्यालयं होणार सुरु)
दरम्यान जम्मू-कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्यानंतर या ठिकाणी कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण न होण्यासाठी केंद्र सरकार हळू हळू पावले पुढे टाकत आहे.तर कलम 370 हटवण्यापूर्वी जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. तसेच ओमर अब्दुल्ला, महबुबा मुफ्ती आणि सज्जाद लोन यांसारख्या बड्या नेत्यांना नैजरकैदेत ठेवण्यात आले होते.