NPS Strike: 13 मार्च रोजी पेंन्शन योजनेच्या विरुद्ध कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास केंद्र सरकार कडक कारवाई करणार

मात्र केंद्र सरकारने या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

Employees Strike | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

NPS Strike: नवीन पेंन्शन योजनेच्या (NPS) विरुद्ध कर्मचाऱ्यांनी येत्या 13 मार्च रोजी संप पुकारणार असल्याचे म्हटले आहे. मात्र केंद्र सरकारने या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

मंत्रालयाने सांगितले की, एनसीपीच्या विरोधात सरकारी कर्मचारी मंच राष्ट्रीय संयुक्त संघर्ष समितीद्वारे हा संप येत्या 13 मार्च रोजी पुकारणार आहेत. तसेच राजधानीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलनही करणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.

मंत्रालयाने नियांमाचा हवाला देत असे म्हटले आहे की, देशातील कोणत्याही कर्मचाऱ्याला संपात सहभागी होण्यासाठी बंदी आणली आहे. यामध्ये सामूहिक आकस्मिक अवकाश, हळू काम करणे यांसारख्या कोणत्याही कारवाईमध्ये सहभागी होण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारे संप पुकारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार नाही. तसेच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना याबाबत कडक कारवाईचा इशारा दिला असून संपात सहभागी झाल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागणार असल्याचे म्हटले आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन कापले जाणार असून त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ 48.41 लाख एवढी आहे. केंद्रीय मंत्रालयाने सरकारी कार्यलय भवानाच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाला योग्य ती कडक यंत्रणा तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.