NIA च्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये Lawrence Bishnoi चा भाऊ Anmol Bishnoi; माहिती देणार्‍याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शुभम लोणकरच्या अकाऊंट वरून पोस्ट करत बिष्णोई गॅंगने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं म्हटलं आहे.

Anmol Bishnoi, | ANI

NIA कडून गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णॉई याला मॉस्टवॉन्टेड लिस्ट मध्ये समावेश केला आहे. त्याला बेड्या घालण्यात मदत करणार्‍याला 10 लाखाचे इनाम देखील जाहीर करण्यात आले आहे. माहितीनुसार, अनमोल बिष्णोई हा कॅनडा आणि अमेरिका मधून आपली गॅंग चालवत आहे. 12 ऑक्टोबरला दसर्‍या दिवशी वांद्रे मध्ये बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या आणि एप्रिल महिन्यात मुंबईत सलमान खानच्या घराजवळ झालेला गोळीबार याचं प्लॅनिंग करण्यामध्ये अनमोलचा हात असल्याचं समोर आलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराजवळ फायरिंगच्या प्रकरणामध्ये 14 एप्रिलला मुंबई पोलिसांनी अनमोल बिष्णोई विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्याने या घटनांमध्ये जबाबदारी स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्येही शूटर अनमोल सोबत स्नॅपचॅटच्या माध्यमातून संपर्कामध्ये असल्याचं समोर आलं आहे. Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा लेक Zeeshan Siddique देखील हिटलिस्टवर? आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडला फोटो .

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शुभम लोणकरच्या अकाऊंट वरून पोस्ट करत बिष्णोई गॅंगने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं म्हटलं आहे. अनमोल बिष्णोई आणि गोल्डी ब्रार हे अमेरिका, कॅनडा मधून गॅंग चालवत असल्याचं समोर आलं आहे. एनआयएने नोंदवलेल्या गुन्ह्यात एकूण सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. सिंडिकेटने देशाच्या अनेक राज्यांमध्ये तसेच परदेशात माफिया शैलीतील गुन्हेगारी नेटवर्क पसरवले आहे.

अनमोल बिष्णोई वर 18 गुन्हे विविध भागात दाखल करण्यात आले आहेत.  एनआयए अनमोलचा शोध  घेत आहे. अधिकार्‍यांना त्यांच्याकडे अनमोलला पकडण्यात मदत करणारी कोणतीही माहिती असल्यास पुढे यावे. ही घोषणा संघटित गुन्हेगारीशी मुकाबला करण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा वाढविण्यासाठी एजन्सीच्या वचनबद्धतेची असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif