नवज्योत सिध्दू यांची काँग्रेसने हकालपट्टी करावी, पंजाब विधानसभेत मागणी

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सिद्धू यांनी ‘दहशतवादासाठी धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,’असे वक्तव्य केले होते.

नवज्योत सिद्धू यांची काँग्रेसने हकालपट्टी करावी, पंजाब विधानसभेत मागणी (फोटो सौजन्य-ट्वीटर)

काँग्रेस (Congress) पक्षाचे आमदार आणि पंजाब (Punjab) पर्यटन मंत्री नवज्योत सिध्दू (Navjot Singh Sidhu) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सिद्धू यांनी ‘दहशतवादासाठी धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,’असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सर्वत्र संतप्त वातावरण झाले होते. तर आता शिरोमणी अकाली दलाने (Shiromani Akali Dal) पंजाबच्या विधानसभेत सिध्दू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.

याबाबत प्रकाश सिंग बादल यांनी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित करावे आणि देशाबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर आज सोमवारी (18 फेब्रुवारी) रोजी पंजाब विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान पुलवामा हल्ल्यातील जवानांना प्रथम श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाकडून सिध्दू यांच्या वक्तव्याबद्दल घोषणाबाजी करण्यात आली. (हेही वाचा-'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंह सिद्धू यांची उचलबांगडी; दहशतवादी हल्ल्यावर वक्यव्य देणे पडले महागात)

मात्र सिध्दू यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ठराव मांडू दिला नाही. त्यामुळे शिरोमणी दलाकडून ठराव नेमका कुठे मांडायचा हा प्रश्न उपस्थित केला आहे. ही घटना निंदनीय आहे आणि ज्‍यांनी हे केले आहे, त्‍यांना शिक्षा मिळायलाच हवी.’ असे वक्त्यव्य सिध्दू यांनी केले होते. यावर चिडलेल्या भारतीय जनतेने ट्विटरवर बायकॉट कपिल शर्मा आणि #boycottsidhu चा ट्रेंडदेखील सुरू केला होता.