Bank Strike: 26 नोव्हेंबरला बॅंकांचा देशव्यापी संपाची हाक; लॉंग विकेंडच्या पार्श्वभूमीवर आजच उरकून घ्या बॅंकेची महत्त्वाची काम
कारण उद्या म्हणजे 26 नोव्हेंबर दिवशी देशातील अनेक बॅंकांनी संपाची हाक दिली आहे
तुमचं बॅंकेशी निगडीत काही महत्त्वाचे काम असल्यास आजच ते उरकून घेण्यामध्ये फायद्याचं आहे. कारण उद्या म्हणजे 26 नोव्हेंबर दिवशी देशातील अनेक बॅंकांनी संपाची हाक दिली आहे. तसेच शनिवार -रविवार आणि सोमवार लागोपाठ सुट्टी आल्याने लोकांची बॅंकेची काम रखडण्याची शक्य्ता आहे. भारतीय बॅंक कर्मचारी संघ (AIBEA)ने याबद्दल माहिती देताना बॅंक कर्मचारी देखील ट्रेड युनियन सोबत 26 नोव्हेंबरच्या राष्ट्रव्यापी बंदामध्ये सहभागी होण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. Bharat Bandh on November 26: 10 प्रमुख ट्रेड युनियनची 26 नोव्हेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक; जाणून घ्या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या.
अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघाने ते देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. कर्मचारी युनियन सध्या केंद्र सरकारच्या श्रम विरिधी धोरणांविरूद्ध उभे राहिले आहेत. या बंदामध्ये भारतीय मजदूर संघ वगळता 10 केंद्रीय ट्रेड युनियन सहभागी होणार आहेत. येत्या 1 डिसेंबरपासून आर्थिक व्यवहारांशी संबंधित होणार 'हे' महत्त्वाचे बदल, रेल्वेतही होणार मोठा बदल.
30000 कर्मचारी होणार सहभागी
भारतीय स्टेट बॅंक आणि इंडियन ओवरसीज बॅंक यांना वगळता देशभर अधिकारिक बॅंका या राष्ट्रव्यापी बंदामध्ये सहभागी होणार आहेत. अनेक सरकारी, जुन्या खजागी बॅंका यांच्यासोबत काही विदेशी बॅंका यांचे मिळून 4 लाख बॅंक कर्मचारी एआईबीईएचा हिस्सा आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, खाजगी बंका, ग्रामीण बॅंका, विदेशी बॅंका यांचे सुमारे तीस हजार कर्मचारी उद्याच्या संपात सहभागी होणार आहेत.
दरम्यान 26 नोव्हेंबरला संपामुळे बॅंक बंद राहिली तरीही 27 नोव्हेंबरला शुक्रवारी व्यवहार पुन्हा खुले होणार आहेत. त्यानंतर शनिवार-रविवार बॅंका बंद राहतील. सोमवारी 30 नोव्हेंबरला गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने बॅंकांना सुट्टी राहणार आहेत. त्यामुळे आज महत्त्वाचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज असेल तर करून घ्या अन्यथा मंगळवारपर्यंत ते लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.