नाशिकच्या एका कंपनीला US FDA कडून सुरूवातीच्या टप्प्यातील Breast Cancer निदानासाठी Liquid Biopsy ला मंजुरी; केवळ ब्लड टेस्ट ने होणार निदान

त्याचा 99% अ‍ॅक्युरसी रेट आहे. सुमारे 20 हजार निरोगी आणि कॅन्सर पिडीत महिलांवर ही चाचणी करण्यात आली आहे.

ब्रेस्ट कॅन्सर (Photo Credits: waldryano/Pixabay)

नाशिकच्या एका कॅन्सर रिसर्च कंपनीने जाहीर केल्यानुसार त्यांना अमेरिकेच्य फूड अ‍ॅन्ड ड्र्ग्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कडून ‘Breakthrough Designation’जारी करण्यात आले आहे. हे सुरूवातीच्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सर च्या निदानासाठी ब्लड टेस्ट साठी आहे. या रक्ताच्या चाचणी मध्ये दातार कॅन्सर जेनेटिक्स कडून खास तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. याद्वारा ट्युमर सेल्सचं आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या क्लस्टर स्पेसिफिकचं निदान करता येते.

क्लिनिकल ट्रायल्सच्या डाटानुसार, स्टेज 0 ते स्टेज 1 मधील ब्रेस्ट कॅन्सरचं यामध्ये निदान केलं जाऊ शकतं. त्याचा 99% अ‍ॅक्युरसी रेट आहे. सुमारे 20 हजार निरोगी आणि कॅन्सर पिडीत महिलांवर ही चाचणी करण्यात आली आहे. या चाचणी करिता केवळ 5 मिली रक्त आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कोणतेही रेडिएशन किंवा मॅमोग्राफीची गरज नाही.नक्की वाचा: Male Breast Cancer: 70 वर्षीय पुरुषास स्तनांचा कर्करोग, दुर्मिळ प्रकरण .

भारतामध्ये 1.7 लाख पेक्षा अधिक महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होते. यामध्ये ते 3 आणि 4 टप्प्यामध्ये कॅन्सर लक्षात येतो. त्यामुळे उपचार देखील महाग, त्रासदायक आणि रूग्ण बचावण्याची शक्यता कमी होते. जर ब्रेस्ट कॅन्सर लवकर समजला तर तो 99% बरा होण्याची शक्यता आहे.

आता पहिल्यांदा चाळीशी पार महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी रक्त चाचणी करू शकणार आहेत. सध्या युरोपामध्ये ही टेस्ट उपलब्ध आहे तर भारतामध्येही लवकरच ‘EasyCheck’अंतर्गत आवाक्यात उपलब्ध केली जाणार आहे. कंपनीकडून हेल्थ केअर प्रोव्हाईडर्स सोबत त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.