Nagpur Futala Lake Musical Fountain : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन आता नागपूरात, म्युझिकल फाउंटन सांगणार नागपूरचा इतिहास

स्वातंत्र्यदिनी नागपूरात मुझिकल फाउंटनचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. फुटाळा तलावातील म्युझिकल फाउंटन हा जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन असल्याचे सांगितले जात आहे.

नागपुराच्या (Nagpur) सुप्रसिध्द फुटाळा तलावाच्या (Futala Lake) निसर्गसौंदर्यात 15 ऑगस्टपासून (15 August) आणखी भर पडणार आहे. स्वातंत्र्यदिनी (Independance Day) नागपूरात मुझिकल फाउंटनचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या फाउंटनमधून संगीताच्या तालावर नागपूरचा इतिहास सांगण्यात येईल, अशी कमालीची टेक्नॉलॉजी (Technology) या मुझिकल फाउंटनमध्ये (Musical Fountain) वापरण्यात आली आहे. नागपूरच्या या मुझिकल फाउंटनमध्ये असलेलं संगीताला इंग्रजी (English) आवाज दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), हिंदी आवाज प्रख्यात गीतकार-दिग्दर्शक गुलजार (Guzar) आणि मराठी आवाज नाना पाटेकर (Nana Patekar)  यांनी दिलेला आहे.

फुटाळा म्युझिकल फाउंटन आणि लाईट-शो प्रकल्पाच्या ट्रायल शोमध्ये खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) हजेरी लावली होती. 15 ऑगस्ट रोजी या मुझिकल फाऊंटनचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. लाईटींग्स (Lightings) आणि हार्डवेअर (Hardware) बसविण्याचे काम पूर्ण झाले असून पाण्याच्या फवाऱ्याशी सलग्न संगीताशी संबंधीत काम सुरू आहे. फुटाळा तलावातील म्युझिकल फाउंटन हा जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन असल्याचे सांगितले जात आहे. या म्युझिकल फाउंटन बरोबर वाजणाऱ्या संगीतीला दिग्दज संगीतकार ए आर रेहमान ( A R Rehman) यांनी संगीत दिले आहे आणि ऑस्कर (Oscar) पुरस्कार विजेते रेसुल पुकुट्टी (Resul Pookutty) यांनी म्युझिक डिझाइन केले आहे. (हे ही वाचा:-DEBEL, DRDO Recruitment 2022: DRDO, DEBEL मध्ये मोठ्या पदांची नोकरी भरती, मिळवा बड्या पगाराची नोकरी)

म्युझिकल फाउंटनचा प्रत्येक शो 34 मिनिटांचा असेल. उद्यान विकसित करण्यासाठी सेंट्रल रोड फंडातून (Central Road Fund) 30 कोटी रुपये देण्यात आले आहेत. प्रत्येक म्युझिकल फाउंटनचा शोला गॅलरीमध्ये 4,000 दर्शकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. तसेच 1,100 वाहनांच्या पार्किंग, 12 मजली इमारत होस्टिंग फूड प्लाझा (Food Plaza), मॉल (Mall), मल्टिप्लेक्स (Multiplex), रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंटचा (Restaurant) समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now