भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात व्हिएतनाममध्ये सापडले 9 व्या शतकातील शिवलिंग; परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडून ASI चे कौतुक
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने अलीकडेच, मध्य व्हिएतनामातील क्वांग नाम (Quảng Nam) प्रांतातील अर्धवट नष्ट झालेल्या हिंदू मंदिरांचा समूह - माय सोनन (Mỹ Sơn) येथे, चालू असलेल्या संवर्धन प्रकल्पाच्या दरम्यान, 9 व्या शतकातील एक शिवलिंग (Shiva Linga) शोधून काढले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने अलीकडेच, मध्य व्हिएतनाम (Vietnam) मधील क्वांग नाम (Quảng Nam) प्रांतातील अर्धवट नष्ट झालेल्या हिंदू मंदिरांचा समूह - माय सोन (Mỹ Sơn) येथे, चालू असलेल्या संवर्धन प्रकल्पाच्या दरम्यान, 9 व्या शतकातील एक शिवलिंग (Shiva Linga) शोधून काढले आहे. एएसआयच्या या कामगिरीबद्दल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी टीमचे कौतुक केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘भारताच्या विकास भागीदारीचे एक उत्कृष्ट सांस्कृतिक उदाहरण’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
व्हिएतनामच्या माय सोन अभयारण्यातील चाम टेंपल कॉम्प्लेक्समधून ही रचना खोदण्यात आली. 2011 मध्ये जयप्रकाश यांनी या अभयारण्याला भेट दिली होती. माय सोन हे युनेस्कोचे (UNESCO) जागतिक वारसा केंद्र असून, इथे 10 शतकांहून अधिक काळापूर्वी बांधलेली अनेक हिंदू मंदिरे आहेत. उत्खनन कार्यादरम्यान झालेल्या आणखी एका शोधामध्ये, पाच फूट लांबीचे शिवलिंग, वाळूचा दगडांमध्ये कोरलेली मूर्ती आणि देवतांच्या काही तुटलेल्या मूर्ती, अयोध्येतल्या राम जन्मभूमी साइटवर सापडल्या. शिवलिंग आणि इतर बाबी जन्मभूमी साइटवर भू-स्तराच्या कामात सापडल्याची माहिती आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस संकटकाळात कर्नाटकात 1 जूनपासून मंदिर उघडण्यास परवानगी; आजपासून सुरु होणार ऑनलाईन बुकिंग)
एस जयशंकर ट्वीट -
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याला आश्चर्य वाटले नसल्याचे सांगितले होते. 2002-2005 दरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात बऱ्याच गोष्टी सापडल्या होत्या, मात्र त्यांनी पुरेसे खोदकाम केले नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयात दिलेल्या अहवालात ते स्पष्टपणे म्हणाले होते की, अनेक संकेत मिळाले होते की या ठिकाणी जुनी मंदिरे आहेत व खोदकामात त्यातील काही अवशेष बाहेर काढण्यात आले.