Modi Government 2.0 ला आज 2 वर्ष पूर्ण, भाजप कडून जल्लोष नाही

तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली असून कोरोनाचे संकट पाहता भाजपचे सरकार असलेल्या राज्यात मुख्यमंत्र्यांना जेपी नड्डा यांनी एक पत्र लिहिले आहे.

PM Narendra Modi | (File Photo)

आज (30 मे) मोदी सरकारला (Modi Government) केंद्राच्या सत्तेत येऊन 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली असून कोरोनाचे संकट पाहता भाजपचे सरकार असलेल्या राज्यात मुख्यमंत्र्यांना जेपी नड्डा यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांनी असे म्हटले की, आजच्या दिनी कोणताही जल्लोष करण्यात येऊ नये. त्याऐवजी स्थानिक सरकारांनी कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्याचसोबत कोरोनामुळे फटका बसलेल्या नागरिकांना मदत करावी असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.(ABP-C Voter Modi 2.0 Report Card: कशी होती मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची 2 वर्षे? जाणून घ्या सरकारचे सर्वात मोठे यश व अपयश)

या व्यतिरिक्त देशातील सर्व भाजप आमदार आणि खासदार यांना एक महत्वपूर्ण जबाबदारी दिली गेली आहे. त्यानुसार त्यांनी गावागावातील लोकांपर्यंत पोहचून त्यांची मदत करावी असे सांगण्यात आले आहे. जेपी नड्डा यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या योजनेनुसार 20 मे रोजी पक्षातील नेते मंडळी 1 लाख गावांचा दौरा करणार आहेत. या दरम्यान भाजपचे कार्यकर्ते गावातील लोकांना मास्क, सॅनिटायझर आणि राशन सारख्या गरजेच्या वस्तूंचेवाट करणार आहेत. त्याचसोबत कोरोना पासून बचाव करण्यासंदर्भात जनजागृती सुद्धा करणार आहेत. ऐवढेच नाही तर केंद्रीय मंत्र्यांना कमीत कमी दोन गावांचा दौरा करावा असे सांगण्यात आले आहे. जर मंत्र्यांना व्यक्तिगत तेथे जाणे शक्य नसेल तर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून बैठक करावी असे आदेश दिले आहेत.

जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवणे हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील महत्वपूर्ण निर्णय होता. एबीपी-सी वोटर मोदी 2.0 रिपोर्ट कार्डच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. एबीपी-सी वोटर सर्वेक्षणच्या नुसार 47.4 टक्के उत्तर देणाऱ्यांनी म्हटले की, कलम 370 हटवणे हे मोदी सरकारचा योग्य निर्णय होता. तर 23.7 टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की, राम मंदिरा बद्दल सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुद्धा मोठी उपलब्धी आहे.(PM Cares For Children: मोफत शिक्षण, मासिक भत्ता आणि दहा लाखांचा निधी; कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा)

543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आलेल्या सर्वेमध्ये 1.39 लाख लोकांसोबत बातचीत केली. हा सर्वे 1 जानेवारी ते 28 मे 2021 दरम्यान करण्यात आला होता. सर्वे मध्ये असे समोर आले आहे की, लॉकडाउन बद्दल सरकारचे लोकांकडून समर्थन करण्यात आले आहे. मोठ्या स्तरावर 68.4 टक्के लोकांनी म्हटले की, गेल्या वर्षात देशव्यापी लॉकडाउन करणे हा एक योग्य निर्णय होता. त्याचप्रमाणे 53.4 टक्के लोकांनी म्हटले, या वर्षात देशव्यापी लॉकडाउन न करणे हा मोदी सरकारचा योग्य निर्णय आहे.