Modani Thali: 'मोदानी थाली- खुद भी खाऊंगा, मित्र को भी खिलाऊंगा'; काँग्रेस पक्षाने उडवली केंद्र सरकारची खिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' (Na khaunga, na khane dunga) या प्रसिद्ध विधानाची काँग्रेस (Congress)पक्षाने खिल्ली उडवली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन एक प्रतिमा सामायिक करत काँग्रेसने 'मोदानी थाली' (Modani Thali) पोस्ट केली आहे.

Modani Thali | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Congress mocked PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' (Na khaunga, na khane dunga) या प्रसिद्ध विधानाची काँग्रेस (Congress)पक्षाने खिल्ली उडवली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन एक प्रतिमा सामायिक करत काँग्रेसने 'मोदानी थाली' (Modani Thali) पोस्ट केली आहे. या प्रतिमेसोबत पंतप्रधानांच्या वाक्याची खिल्ली उडवत 'खुद भी खाऊंगा, मित्र को भी खिलाऊंगा' (𝐊𝐡𝐮𝐝 𝐁𝐡𝐢 𝐊𝐡𝐚𝐮𝐧𝐠𝐚, 𝐌𝐢𝐭𝐫 𝐊𝐨 𝐁𝐡𝐢 𝐊𝐡𝐢𝐥𝐚𝐮𝐧𝐠𝐚) म्हणत हल्ला चढवला आहे. मजेशीर असे की, काँग्रेसने ट्विटरवर मोदानी थाली म्हणत जी प्रतिमा सामायिक केली आहे त्यात देशातील महत्त्वाच्या संस्था, कंपन्यांचा उल्लेक करुन त्यांना पदार्थ म्हणून संबोधण्यात आले आहे. काँग्रेसचे हे ट्विटर प्रचंड व्हायरल झाले आहे. ज्यावर ट्विटर वापरकर्त्यांकडून लाईक, शेअर आणि रिट्विट्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

काँग्रेसने ट्विटरवर पोस्ट केलेल्या 'मोदानी थाली'मध्ये जे पदार्थ दाखवले आहेत ते पुढील प्रमाणे- बँक्स का भरता (प्रमुखांसाठी खास), डाल मोदानी (प्रमुखासाठी खास), रेल्वेचा रायता, PUSचे लोणचे, साग दरबारी (मोदींचे आवडते), एअरपोर्ट्सचा कोरमा (नवी डीश). काँग्रेसने आपल्या कल्पकतेचा वापर करत केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. ज्यामुळे प्रतिक्रियांमध्ये काँग्रेस विरोधी विचारांचे ट्विटर वापरकर्ते काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. तर काही वापरकर्त्यांनी काँग्रेसने ट्विटरवर सामायिक केलेल्या प्रतिमेवर अत्यंत मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मग या ट्विटला पाठिंबा दर्शवणारी ट्विट केली आहेत. (हेही वाचा, Rahul Gandhi: राहुल गांधी यांची अमेरिकेमध्ये ट्रक सफर, वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क प्रवासादरम्यान जाणून घेतले चालकाचे जीवन)

ट्विट

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरुन आज (14 जून) सकाळी 11.48 वाजता हे ट्विटर शेअर करण्यात आले आहे. तेव्हापासून हे वृत्त लिहीपर्यंत या ट्विटला तब्बल 1,174 लोकांनी रिट्विट केले होते. तर तब्बल 3,563 वापरकर्त्यांनी लाईक केले होते. 60 लोकांनी हे ट्विट स्वत:च्या प्रतिक्रियेसह रिट्विट केले होते. तर 15 लोकांकडून हे ट्विट बुकमार्क झाले होते. ही आकडेवारी अद्यापही वाढतेच आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now