Military Chopper Crash: तामिळनाडूमध्ये भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश; लष्कर प्रमुख Bipin Rawat यांच्यासह 13 जणांचा मृत्यू
कुन्नूरमध्ये कोसळलेले लष्कराचे हेलिकॉप्टर सामान्य हेलिकॉप्टर नव्हते. ते Mi-17V-5 हेलिकॉप्टर होते, जे लष्करी वापरासाठी अतिशय प्रगत मानले जाते
तामिळनाडूतील (Tamil Nadu) कुन्नूर येथे भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश (Chopper Crash) झाले आहे. लष्करप्रमुख असलेले आणि आता संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) हेही या हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर अनेक लष्करी अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. आज दुपारच्या सुमारास IAF Mi 17 V5 हेलिकॉप्टर चा अपघात झाला. दुर्दैवाने या घटनेमध्ये बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
बिपिन रावत आज दिल्लीहून भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरसह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुलूरहून वेलिंग्टनला जात होते. वेलिंग्टन येथे सशस्त्र दलांचे महाविद्यालय आहे. येथे सीडीएस रावत व्याख्यान देणार होते, मात्र कुन्नूरच्या घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कर आणि स्थानिक पोलीस अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आहेत व बचावकार्य सुरु आहे. जनरल रावत यांची 1 जानेवारी 2020 रोजी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या अपघाताची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत देणार असल्याची माहिती ऑल इंडिया रेडिओने दिली आहे. कुन्नूरमध्ये कोसळलेले लष्कराचे हेलिकॉप्टर सामान्य हेलिकॉप्टर नव्हते. ते Mi-17V-5 हेलिकॉप्टर होते, जे लष्करी वापरासाठी अतिशय प्रगत मानले जाते. ज्याचा उपयोग सैन्यदल आणि शस्त्रास्त्र वाहतूक, फायर सपोर्ट, एस्कॉर्ट, गस्त आणि शोध आणि बचाव (SAR) मोहिमांसाठी देखील केला जातो. भारतातील अनेक VVIP हे हेलिकॉप्टर वापरतात. (हेही वाचा: नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवास सुलभतेसाठी Air Suvidha Portal केले अनिवार्य)
हे दुहेरी इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे, ज्यामुळे एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱ्या इंजिनच्या मदतीने सुरक्षित लँडिंग करता येते. या हेलिकॉप्टरची तुलना चिनूक हेलिकॉप्टरशी केली जाते.