Coronavirus Lockdown: देशातील नोंदणीकृत दुकाने काही अटींवर सुरु करण्यास गृह मंत्रालयाची परवानगी; 50 टक्केच कर्मचारी करू शकणार काम
तेव्हापासून देशातील आवश्यक सोयी सुविधा सोडून इतर सर्व गोष्टी बंद आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशात 23 मार्च पासून लॉकडाऊन (Lockdown) चालू आहे. तेव्हापासून देशातील आवश्यक सोयी सुविधा सोडून इतर सर्व गोष्टी बंद आहेत. मात्र आता आज केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत 25एप्रिलपासून देशातील दुकाने उघडण्यास (Shops Open) परवानगी दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार गृह मंत्रालयाने (MHA) शनिवारपासून अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची विक्री करणारी दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. हा आदेश महापालिकांमधील बाजार संकुलातील दुकानांना लागू आहे. तसेच गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा आदेश हॉटस्पॉट्स किंवा कंटेनमेंट झोनमधील दुकानांसाठी लागू नसणार.
एएनआय ट्विट -
या आदेशात असे स्पष्ट केले गेले आहे की, दुकाने उघडण्याची परवानगी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्सना लागू नाही. फक्त महानगरपालिकेत नोंदणीकृत स्थानिक दुकानेच उघडण्याची परवानगी आहे. सब-कलम 1 (X) मध्ये 'शॉपिंग कॉम्प्लेक्स' हा शब्द 'महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत' बाजार संकुलाच्या जागी बदलण्यात आला आहे. (हेही वाचा: कधी संपणार भारतामधील कोरोना व्हायरसचे संकट? जाणून घ्या काय म्हणतो आरोग्य मंत्रालय आणि PIB ने जाहीर केलेला अहवाल)
या व्यतिरिक्त, संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या दुकाने व आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणीकृत सर्व दुकाने या आदेशात समाविष्ट आहेत. निवासी कॉम्प्लेक्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील दुकानांचाही यात समावेश आहे. मात्र मॉलमधील मल्टी-ब्रँड आणि सिंगल ब्रँड दुकाने उघडण्याची परवानगी नाही. यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, अशा दुकानात फक्त 50 टक्केच कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी असेल आणि त्यांनी मास्क परिधान करणे गरजेचे आहे, तसेच सामाजिक अंतर ठेवूनच काम करणे बंधनकारक आहे.
गेले काही दिवस लॉक डाऊनमुळे व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प आहेत. याचा परिणाम सामान्य जनतेच्या आयुष्यावर होताच आहे मात्र देशाचेही फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आता गृह मंत्रालयाच्या या आदेशामुळे काही प्रमाणात तरी व्यवहार होऊ पैशांची आवक जावक वाढेल.