Rafale Audio Leak: कॉंग्रेसची ऑडिओ क्लिप हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न, मनोहर पर्रीकर यांचा ट्विटरवर खुलासा

कॅबिनेट अथवा कोणत्याच मिटिंगमध्ये राफेल डील (Rafale Deal) प्रकरणी चर्चा झाली नसल्याचं पर्रिकर यांनी म्हटलं आहे.

File image of Goa Chief Minister Manohar Parrikar | (Photo Credits: IANS)

Rafale Audio Leak:  नवी दिल्लीत आज कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी आणि मोदी सरकार यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. गोव्याचे कॅबिनेट मंत्री विश्वजीत राणे यांची ऑडिओ क्लिप लीक झाल्यानंतर समोर आलेल्या संभाषाणातून गल्लीपासून दिल्लीत लोकसभेमध्ये वातावरण तापले आहे. मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांनी कॉंग्रेसच्या आरोपांचे खंडन करणारे ट्विट करत आपली बाजू मांडली आहे.  कॅबिनेट अथवा कोणत्याच मिटिंगमध्ये राफेल डील (Rafale Deal) प्रकरणी चर्चा झाली  नसल्याचं पर्रिकर यांनी म्हटलं आहे.  राफेल प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी करण्याची खासदार  अरविंद सावंत यांची मागणी

मनोहर पर्रीकरांचे ट्विट

मनोहर पर्रीकर नव्या वर्षात आजारपणावर मात करत पुन्हा उभे राहिले आहेत. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी ते चार महिन्यांनी सचिवालयात परतले. आज राफेल विमान प्रकरणी झालेल्य भ्रष्टाचाराबाबत बोलताना तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरूममध्ये कराराची सारी कागदपत्र आहेत. पर्रीकर यावरूनच केंद्र सरकारला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे.Rafale Deal प्रकरणी सारी कागदपत्र मनोहर पर्रिकर यांच्याकडे, केंद्र सरकारला Blackmail करत असल्याचा कॉंग्रेसचा दावा

काय आहे मनोहर पर्रीकरांचं मत

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काँग्रेसचा खोटेपणा सर्वोच्च न्यायालयात उघड झाला आहे. वस्तुस्थितीत फेरफार करून राफेल प्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पर्रीकर यांनी म्हटले आहे.