भारतीय नौसेनेची ताकद वाढणार, मेक इन इंडिया निर्मिती लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी एल-58 नेवी मध्ये दाखल

भारतीय नौसेनेची ताकद वाढणार, मेक इन इंडिया निर्मिती लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी एल-58 नेवी मध्ये दाखल लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी (LUC) एल-58 पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील भारतीय नौसेनेत दाखल झाली आहे.

भारतीय नौसेना (Photo Credits: PTI)

भारतीय नौसेनेची ताकद वाढणार, मेक इन इंडिया निर्मिती लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी एल-58 नेवी मध्ये दाखल लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी (LUC) एल-58 पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील भारतीय नौसेनेत दाखल झाली आहे. हे जहाज आपल्या चालक दलाव्यतिरिक्त 160 सैनिकांना घेऊन जाण्यास सक्षम असणार आहे. हे मार्क IV क्लासमधील आठवे आणि अखरचे जहाज आहे. नौसेनेत हे दाखल करतेवेळी कमांडर कृष्ण के. यादव यांनी जहाजापूर्वीच्या कमाडिंग अधिकाऱ्यांच्या रुपात याचे कमीशन वॉरंट वाचले. एल-58 च्या नौसेनेत सहभागी झाल्यानंतर आता भारताकडे कुम्भिर वर्गातील 3 एलसीयू आणि चतुर्थ श्रेणीतील 8 एलसीयू झाले आहेत. हे जहाच लढाऊ वाहने, युद्धातील टँकसह 900 टन वजनाचे सामान सुद्धा वाहून नेऊ शकणार आहे. जीआरएसईने हे जहाज 31 डिसेंबर 2020 ला नौसेनेला सोपवले होते.

एलसीयू 58 एक उभयचर जहाज आहे. जे आपल्या चालकशिवय 160 सैनिकांना घेऊन जाण्यास सक्षम आहे. तसेच विविध प्रकारची लढाऊ विमाने, मेन बॅटल टँक, बीएमपी, ट्रकच्या रुपात 900 टन वजन घेऊन जाऊ शकते. जहाजाची लांबी 63 मीटर असून याचे इंजिन 15 समुद्री मील (28 किमी प्रति तास) वेगाने चालण्यास सक्षम आहे. नौसेनेच्या प्रवक्तांनी असे म्हटले की, जहाजावर पाच अधिकारी आणि 50 नाविकांची एक उत्साही टीम तैनात आहे. कोलकाताची कंपनी जीआरएसई यांनी स्वदेशी रुपात डिझाइन आणि निर्मित करुन देशाला 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' अभियनाच्या यशात मध्ये आणखी एक भर पडली आहे.(Hurun India Wealth Report 2020 जाहीर; देशात 4.12 कुटुंब कोट्याधीश; मुंबई यादीमध्ये अव्वल स्थानी) 

जहाजासाठी दोन स्वदेशी निर्माण करण्यात आलेले 30 मिमी सीआरएन 91 बंदुक, जी एक स्थिर ऑप्टोनिक क्रॉनिकल (एसओपी) द्वारे नियंत्रित होणार आहे.या व्यतिरिक्त जहाजाला हवा, पृष्ठभाग आणि काही समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी सहा मशीन गन पोस्ट लावण्यात आली आहे. प्रवक्तांच्या मते, जहाजात इलेक्ट्रॉनिक सपोर्ट सिस्टिम सुद्धा लावण्यात आले आहे. त्यामुळे दुश्मनांच्या रडारपासून बचाव करता येणार आहे. या व्यतिरिक्त जहाजात इंटीग्रेटेड ब्रिज सिस्टिम आणि एक परिष्कृत इंटीग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टिम ही लावण्यात आले आहे. पुढे त्यांनी असे ही म्हटले की, नौसेनेत आज सहभागी झालेली लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी 58 पोर्ट ब्लेअरवर आधारित असणार आहे.