Madhya Pradesh: वापरलेली PPE किट पाण्यात धुवून विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश, सोशल मीडियात Video व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, वापरण्यात आलेली पीपीई किट धुवून पुन्हा एकदा विक्री करण्यासाठी तयार केली जात आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सतना येथून अत्यंत हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, वापरण्यात आलेली पीपीई किट धुवून पुन्हा एकदा विक्री करण्यासाठी तयार केली जात आहे. सतना जिल्ह्यातील बडखेरा मधील प्लांट मध्ये कथित रुपात वापरण्यात आलेली पीपीई किट, मास्क आणि हँड ग्लोव्स पुन्हा एकदा वापरण्यासाठी धुतले जात होते. किट गरम पाण्यात टाकून त्याचे बंडल तयार करुन एकदा वापरल्यानंतर किटचे पूर्णपणे विघटन केले जाते. तर किटचा पुन्हा एकदा वापर करता येत नाही.

पीपीई किट बद्दलचे हे प्रकरण समोर आल्यानंतर एसडीएम राजेश साही यांनी असे म्हटले की, हा व्हिडिओ बडखेरा गावातील बायो वेस्टेज प्लांट येथील आहे. तेथे आमची एक टीम पाठवण्यात आली आहे. त्यांनी तपास केला असून उद्या रिपोर्ट्स येणार आहेत. रिपोर्ट्स समोर आल्यानंतरच यामागील सत्यता समोर येईल. जर ही बाब खरी निघाली तर या प्रकरणी कठोर कार्यवाही केली जाईल.(Covid-19 Vaccination in India: दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांना आता घराजवळच्या लसीकरण केंद्रात मिळणार लस; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

कोविडच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांच्याकडून पीपीई किटचा वापर केला जातो. तसेच एकदा पीपीई किट वापरल्यानंतर ती फेकून दिली जाते. ती नष्ट करण्याची जबाबदारी बायो वेस्ट डिस्पोजल प्लांट यांच्याकडे असते. प्लांटमध्ये ती नष्ट करण्यासाठी गरम पाण्याता धुतात आणि पुन्हा एकदा पॅक करुन शहराबाहेर विक्री केली जात आहे.(Sputnik-V लस जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार उपलब्ध, Apollo रुग्णालयात नागरिकांचे होणार लसीकरण)

सरकारच्या गाइडलाइन्स नुसार, पीपीई किट, ग्लव्स आणि मास्क वैज्ञानिक पद्धतीने नष्ट करण्यासाठी बडखेका येथील इंडो वॉटर बायो वेस्ट डिस्पोजल येथील प्लांटमध्ये पाठवले जातात. परंतु प्लांटमध्ये असे केले जात नाही आहे.