मध्य प्रदेश: तरुणीच्या गोड बोलण्यात फसले निवृत्त अधिकारी, वाढदिवसाच्या पार्टीदिवशी एकटे गेल्याने गमावले तब्बल 6 लाख

मध्य प्रदेशातील ग्वालियार मधील वीज विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना 2 महिला आणि एका व्यक्तीने हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे.

Honey Trap Case | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: (File Photo)

मध्य प्रदेशातील ग्वालियार मधील वीज विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना 2 महिला आणि एका व्यक्तीने हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेचा वाढदिवस असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना घरी बोलावून थांबवून घेतले. पण जेव्हा सकाळ झाली त्यावेळी महिलेसोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप लावत त्यांच्याकडून तब्बल 6 लाख रुपये घेतले. ऐवढेच नव्हे तर पैसे घेतल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यास त्यांनी सुरुवात केली.(Madhya Pradesh: मध्य प्रदेश येथे पंखा चोरणाऱ्याला तब्बल 23 वर्षानंतर झाली शिक्षा)

डबरा जिल्ह्यात राहणारे रिटायर्ड अधिकारी विद्युत विभागातून ऑगस्ट 2020 मध्ये निवृत्त झाले होते. परंतु निवृत्त होण्यापूर्वी त्यांची पोस्टिंग भितरवार जिल्ह्यात केली होती. तेथे त्यांनी मंजू जावट नावाच्या महिलेच्या घरी एक खोली भाड्यावर घेतली होती. निवृत्त झाल्यानंतर खोली खाली करुन ते घरी परतले. तर मंजू हिने निवृत्त अधिकाऱ्यांना आपल्या घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावले होते. पण त्यांना रात्री घरीच थांबवून घेतले. पण दुसऱ्या दिवशी अधिकारी उठले तेव्हा त्यांच्या बेडवर सलमा नावाटी एक महिला झोपली होती. तेथेच मंजू आणि सलमा यांचा नवरा उभा होता.

तेव्हाच मंजूने निवृत्त अधिकाऱ्याला म्हटले की तुम्ही माझ्यासोबत गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे या प्रकरणातून स्वत:ची सुटका करुन घ्यायची असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील. घाबरलेल्या अधिकाऱ्याने 4 लाख रुपये दिले. तर काही दिवसांनी फोन करुन आणखी पैसे मागितले असता त्याने बायकोचे दागिने विकून 1 लाख रुपये दिले.(धक्कादायक! विनयभंग करुन महिलेला जबरदस्तीने पाजले अ‍ॅसिड, धारधार शस्त्राने पोटही फाडले, उत्तर प्रदेशमधील घटना)

अधिकाऱ्याकडून आपण जसे बोलू तसे पैसे मिळतात हे पाहून त्यांनी अजून पैसे मागितले. त्यावेळी पुन्हा एक लाख रुपये अधिकाऱ्याने त्यांना दिले. ऐवढे पैसे देऊन सुद्धा ब्लॅकमेल करत असल्याने अखेर अधिकाऱ्याने गुन्हे शाखेकडे याबद्दल तक्रार केली. तक्रारी नुसार पोलिसांनी 2 महिला आणि एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना शोध घेत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now