Lucknow Shocker: बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून इयत्ता 8 वीतील मुलीची आत्महत्या

यूपी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे तो केवळ 14 वर्षांचा आहे.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Uttar Pradesh Shocker: बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या (Girl Commits Suicide) केली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्याती घडली. प्राप्त माहितीनुसार पीडितेचा प्रियकर तिला इंटिमेट व्हिडिओवरून (Intimate Video) त्रास द्यायचा. तिच्या असहायतेचा फायदा घेऊन शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत असे. सततच्या त्रासाला कंटाळून तिने विष प्राशन करुन आत्महत्या केली. तिने विष प्राशन केल्याचे कळताच तिला बलरामपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

वजीरगंजमधील गोलागंज भागातील रहिवासी असलेली पीडित मुलगी या परिसरात असलेल्या एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होती, असे पोलिसांनी सांगितले. यूपी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे तो केवळ 14 वर्षांचा आहे.

पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन एफआयआर दाखल केली आहे. एफआयआरमधील उल्लेखानुसार आरोपीने मुलीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या संबंधाचे मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ बनवले. त्याने या व्हिडिओंचा उपयोग पीडितेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यासाठी केला होता. त्याच्या सततचा दबाव आणि त्रासाला कंटाळून मुलीने सोमवारी सायंकाळी विषारी द्रव्य प्राशन केले. मंगळवारी सायंकाळी बलरामपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की, ती सोमवारी नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. मात्र, नंतर ती शाळेतून घरी परतली नाही. दरम्यान, दालीगंज पुलाजवळ मुलगी बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांना आढळली, अशी माहिती पोलिसांनी दिली. घरी नेल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडली. यावरून नातेवाइकांनी तिला बलरामपूर रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. किशोरीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती त्यांच्या मोठ्या मुलीने म्हणजेच पीडितेच्या मोठ्या बहिणीने दिली होती, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला हॉटेलमध्ये नेले होते. कालांतराने त्याने त्याच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

यादरम्यान आरोपी तरुणाने तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवला. आरोपी अनेकदा तरुणीला हॉटेलमध्ये जाण्यास भाग पाडत असे. विरोध केल्यावर आरोपी तरुणीला तिचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायचा. पीडितेच्या वडिलांनी आरोपींसोबत व्हॉट्सअॅप चॅटिंगचा तपशील आणि इतर माहितीच्या आधारे वजीरगंज पोलिसांकडे तक्रार केली आहे. वजीरगंजचे एसएचओ मनोज मिश्रा यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या कथित छळ करणाऱ्याविरुद्ध आयपीसी 305 (मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणे) च्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif