L&T चे निवृत्त चेअरमन Anil Naik यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान; संपूर्ण करिअरमध्ये एकही सुट्टी न घेता कमावले तब्बल 20 कोटी रुपये

कमी सुट्ट्या घेण्यात भारतीय अग्रेसर आहेत. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे.

Anil Manibhai Naik (Photo Credit: Facebook)

लार्सेन अँड टूब्रो (Larsen and Toubro) मधून निवृत्त झालेले नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमन अनिल मनिभाई नाईक (Anil Manibhai Naik) यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील योगदानासाठी 26 जानेवारी रोजी देशातील दुसऱ्या सर्वोच्च पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आरबीआयचे डायरेक्टर एस. गुरुमुर्ती यांनी ए. एम. नाईक यांना पद्मविभूषण देऊन सन्मान केल्यानंतर सांगितले की, ए. एम. नाईक पद्म विभूषण सन्मानाचे हक्कदार आहेत. ते एक राष्ट्रभक्त आणि प्रतिभावान प्रोफेशनल आहेत. L&T मध्ये त्यांनी दिलेल्या सेवा वाखाण्यासारख्या आहेत. मिस्टर नाईक यांना शुभेच्छा. 2000 मध्ये अंबानी L&T ग्रुप टेकओव्हर करण्याच्या तयारीत असताना नाईक यांनी कंपनी सावरली, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. (लातूर येथील डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभुषण' पुरस्कार जाहीर)

कमी सुट्ट्या घेण्यात भारतीय अग्रेसर आहेत. याचाच प्रत्यय देणारे एक उदाहरण म्हणजे अनिल नाईक. संपूर्ण करिअरमध्ये एकही सुट्टी न घेतल्याने कंपनीकडून त्यांना सुमारे 20 कोटी रुपये देण्यात आले आहेत. अनिल नाईक हे गेल्या पाच दशकांपासून L&T मध्ये कार्यरत आहेत. L&T च्या 2017-18 वर्षाच्या रिपोर्टनुसार, नाईक यांनी संपूर्ण करिअरमधील सुट्ट्या इनकॅश करुन घेतल्याने त्यांनी तब्बल 19.40 कोटी रुपये कमावले आहेत. त्यांची बेसिक सॅलरी 2.73 कोटी रुपये असून वार्षिक उत्पन्न सुमारे 1.37 अब्ज रुपये आहे. त्याचबरोबर रिटायरमेंट ग्रॅच्युएटी आणि स्टॉक असे एकत्रितपणे त्यांनी सुमारे 1 अब्ज (1 बिलियन) हून अधिक कमाई केली आहे. (प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख यांना 'भारतरत्न' जाहीर)

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नाईक सांगितले की, "मला रविवारी सुट्टी घेणे देखील खूप कठीण होते. सुट्टी नसल्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या मुलांना भेटायला जाणे देखील शक्य होत नाही. मी रात्री घरी येतो आणि सकाळी पुन्हा बाहेर पडतो. नाईक यांचा मुलगा जिग्नेश कॅलिफोर्नियात गुगलमध्ये काम करतो. तर सून रुचा सेफवे मध्ये सीईओ आहे. नाईक यांची मुलगी प्रतिक्षा आणि जावई मुकुल दोघेही डॉक्टर आहेत."

नाईक यांचे वडील गुजरातमधील एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. नाईक यांनी ज्युनिअर इंजिनिअर म्हणून L&T आपल्या कार्याला सुरुवात केली. हळूहळू पदोन्नती घेत नाईक यांनी कंस्ट्रक्शन कंपनीच्या एंट्री डिफेंस फिल्ड करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. 1.83 लाख कोटींचा कारभार असलेल्या L&T ग्रुपमध्ये त्यांनी IT आणि आर्थिक सेवा उपलब्ध करुन दिल्या. आपल्या उत्पन्नातील 75% भाग चॅरिटी देणार असल्याची घोषणा त्यांनी ऑगस्ट 2016 मध्ये केली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement