LPG Cylinder Price: आजपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ, गृहिणींचे बजेट कोलमडणार
अशातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे नवे दर आज दुपारी 12 वाजल्यापासून सर्वत्र लागू केले जाणार आहेत.
LPG Cylinder Price Hike : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे नवे दर आज दुपारी 12 वाजल्यापासून सर्वत्र लागू केले जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही दुसऱ्यांच्या गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. याआधी 4 फेब्रुवारीला गॅसचे दर वाढवण्यात आले होते. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने दिल्लीतील ग्राहकांना तो आता 769 रुपयांना मिळणार आहे.(पगाराबाबत माहिती देण्यासाठी होणार WhatsApp चा उपयोग? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; नवीन Labour Code च्या नियमांमध्ये केले बदल)
देशातील विविध राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 90 ते 100 रुपयांच्या दरम्यान आहे. मध्य प्रदेशात प्रीमियम पेट्रोलची किंमती 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर 95 रुपये आहे. देशात गेल्या 6 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. या किंमतीबद्दल ही समीक्षा केली जातेच. त्याचसोबत एलपीजी गॅसच्या किंमतीची 15 दिवसांत समीक्षा केली जाते. मुंबईत सुद्धा सध्या एलपीजी गॅल सिलिंडरचे दर 719 रुपये आहे. (IRCTC-iPay, आयआरसीटीसीची नवी पेमेंट गेटवे सुविधा सुरू, तिकीट बुकिंग झालं सोप्प, रिफंड देखील तात्काळ मिळणार)
सरकारचे असे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइल आणि नैसर्गिक गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतात याच्या किंमतीत वेगाने वाढ होतआहे. दरम्यान,समीक्षकांचे असे म्हणणे आहे की पेट्रोल आणि डिझेलचवर केंद्रीय आणि राज्यांच्या जबरदस्त करांमुळे त्यांचे दर वाढत आहेत.