Lockdown 4.0: देशातील लॉकडाऊन मध्ये 31 मे पर्यंत वाढ; 9 वाजता जाहीर होणार नियमावली
सोमवारपासून देशात लॉकडाऊन 4.0 ला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही नियमावली जाहीर केलेली नाही. आज रात्री 9 वाजता कॅबिनेट सचिव सर्व राज्यांच्या मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. यात लॉकडाऊन 4.0 संदर्भातील नियमावलीविषयी चर्चा होणार आहे.
Lockdown 4.0: कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण थांबवण्यासाठी देशात येत्या 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवण्यात आला आहे. सोमवारपासून देशात लॉकडाऊन 4.0 ला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही नियमावली जाहीर केलेली नाही. आज रात्री 9 वाजता कॅबिनेट सचिव सर्व राज्यांच्या मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. यात लॉकडाऊन 4.0 संदर्भातील नियमावलीविषयी चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आठवड्यात देशाला संबोधित करताना लॉकडाऊनचा काळावधी वाढवणार असल्याचे सांगितले होते. परंतु, त्यावेळी त्यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन विषयी सविस्तर माहिती दिली नव्हती. 17 मे रोजी नागरिकांना लॉकडाऊन 4.0 संदर्भात माहिती दिली जाईल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार, आज चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा - Coronavirus: गेल्या 24 तासांत सीमा सुरक्षा दलातील 10 जवानांना कोरोना व्हायरसची बाधा)
दरम्यान, महाराष्ट्रात केंद्र सरकारने घोषणा करण्याअगोदर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यात येत्या 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्यावर चर्चा करण्यात आली होती.