Lockdown: अन्न, औषधं खरेदी करण्यासही नाहीत पैसे; 62.5% लोकांना सतावतेय आर्थिक तंगी
या वर्गातील जवळपास 70 टक्के लोकांकडे तीन आठवडे पुरेल इतका जीवनावश्यक वस्तुंचा साठा नाही. तो करण्याची क्षमताही नाही.
Lockdown: देशभरातील विविध समाज, वयोगट, शिक्षण आणि धर्मातील 62.05% स्त्री-पुरुष आर्थिक तंगीचा सामना करत आहेत. या गटांकडे अन्न, औषध तसेत इतर आवश्यक गोष्टी खरेदी करण्याइतपतही पैसा नाही. 'आयएनएस सी-वोटर कोविड ट्रॅकर्स इंडेक्स ऑफ पॅनिक' सर्वेमध्ये हा खुलासा झाला आहे. काही नागरिकांकडे तर तीन महिने पुरेल इतकेही अन्नधान्य, अथवा पैसा नाही.
'आयएनएस सी-वोटर कोविड ट्रॅकर्स इंडेक्स ऑफ पॅनिक' सर्व्हेदरम्यान 37.05% लोकांनी सांगितले की, ते तीन आठवड्यांपेक्षा अथिक काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक गोष्टींनी सज्ज आहेत. हा आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण देशात कोविड 19 या महामारी विरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदतही जवळपास आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्यात आली आहे.
सर्वेत पुढे आलेल्या माहितीनुसार, कमी उत्पन्न आणि कमी शिक्षण असलेला मोठा समूह अत्यंत वाईट स्थिती आहे. या वर्गातील जवळपास 70 टक्के लोकांकडे तीन आठवडे पुरेल इतका जीवनावश्यक वस्तुंचा साठा नाही. तो करण्याची क्षमताही नाही.(हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस संकट तोडणार नोकऱ्यांचा लचका, बेरोजागारी वाढणार, प्रत्येक चारपैकी एक जण होणार बेकार- सीएमआयई)
सर्व्हेतील आकडे सांगतात की, कमी उत्पन्न असलेला वर्ग हा समाजातील खालच्या वर्गाशी संबंधित आहे. या कुटुंबाकडे चरीतार्थ चालविण्यासाठी पुरेशा संसाधनांचा अभाव आहे. त्याउलट मध्यवर्गीय कुटुंबाकडे तीन आठवडे पुरेल इतका अन्नधान्य आणि जीवनावश्यक गोष्टींचा साठा आहे. केवळ उच्च मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय मंडळींकडे तीन आठवड्यांपेक्षाही अधिक काळ चरीतार्थ चालू शकेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे. तो घेण्याची आणि करण्याची त्यांची क्षमता आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरना व्हायरस संकटामुळे नोकरी गेली तर घाबरू नका, काळजी घ्या; काय करायला हवे जाणून घ्या)
शहरी भागातील 55 टक्के लोकांकडे पुरेशा प्रमाणात आवश्यक वस्तू आहेत. त्यांच्याकडे तीन आठवडे पुरेल इतक्या वस्तू आणि इतर साहित्य घेण्यासाठी पुरेसा पैसा आहे. ग्रामीण आणि निमशहरी लोकांचे म्हणने असे की, त्यांच्याकडे तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ चरीतार्थ चालविण्यासाठी पुरेसा अन्नधान्य साठा आहे. अशा लोकांचा आकडा सुमारे 65 टक्के इतका आहे.