Aarey Metro Car Shed: आंदोलनामागे छद्म पर्यावरणवादी, खर्या पर्यावरणवाद्यांची समजूत काढू - देवेंद्र फडणवीस
आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांमध्ये जर खरे पर्यावरणवादी असतील तर त्यांची समजूत काढली जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच (Aarey Colony) बनवण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आज आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आज आंदोलनाची हाक दिली होती. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही आरेबाबतच्या निर्णयावर शिंदे सरकारला (Shinde Govt) पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केली आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सगळ्यांना माहिती आहे, आरेतील झाडं कापली आहेत, आता नवीन झाडं कापण्यात येणार नाहीत. असं असतानाही काही पर्यावरणवाद्यांकडून आंदोलन केलं जात आहे. त्यांना याची योग्य आणि पूर्ण माहिती नसावी. यामागे काही नकली पर्यावरणवादी कार्यरत आहेत. खर्या पर्यावरणवाद्यांची समजूत काढू. मुंबईला पर्यावरण पूरक आम्ही मेट्रो देत असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
हा प्रकल्प दुसरीकडे नेणं म्हणजे नाकापेक्षा मोती जड असल्याचही ते म्हणाले. आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांमध्ये जर खरे पर्यावरणवादी असतील तर त्यांची समजूत काढली जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरेतील 25 टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे असं सांगत हा प्रकल्प आरेतच होईल असंही ते म्हणाले. (हे देखील वाचा: Aditya Thackeray Statement: कसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र)
अमित ठाकरेंनी केला होता विरोध
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे देखील आरे येथील मुंबईतील मेट्रो कारशेडला विरोध दर्शवला आहे. 'आरे' कारशेडबाबत 'नव्या उपमुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करावा', अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी शेअर केली होती.