LAC Row: अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत-चीन सैनिकांमध्ये हिंसक चकमक; अनेक सैनिक जखमी
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 डिसेंबरच्या रात्री घडली. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. जखमी झालेल्या चिनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांपेक्षा जास्त आहे. सुमारे 300 सैनिकांसह चीन जोरदार तयारी करून आला होता, परंतु भारतही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल याबाबत ते गाफील होते. आता या भागातील भारताच्या कमांडरने प्रदेशात शांतता पुनर्संचयित करण्यासाठी एक बैठकही घेतली.
2020 मध्ये, लडाखच्या गलवान खाटीमध्ये चिनी सैनिकांनी LAC ओलांडल्यावर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसक चकमकीत 40 भारतीय जवान शहीद झाले. गलवानमध्ये अजूनही दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. अशा परिस्थितीत चीनने पुन्हा एकदा चिथावणीखोर कारवाई केली आहे.
On 9th Dec 2022, PLA troops contacted the LAC in Tawang Sector of Arunachal Pradesh which was contested by Indian troops in a firm and resolute manner. This face-off led to minor injuries to a few personnel from both sides. Both sides immediately disengaged from the area: Sources pic.twitter.com/vQLXcM3xLS
— ANI (@ANI) December 12, 2022
In certain areas along the LAC in the Tawang Sector in Arunachal Pradesh, there are areas of differing perception, wherein both sides patrol the area upto their claim lines. This has been the trend since 2006: Sources
— ANI (@ANI) December 12, 2022
Indian troops in area of face-off in Tawang gave befitting response to Chinese troops.Number of Chinese soldiers injured is more than that of Indian soldiers.Chinese had come heavily prepared with around 300 soldiers but didn't expect Indian side also to be well prepared: Sources pic.twitter.com/hKVVIQlSp4
— ANI (@ANI) December 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2022 07:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

