Kerala Variety Farmer Video: शेतकऱ्याचा स्वॅग! बाजारात भाजीपाला विकण्यासाठी आला अलिशान Audi A4 कारमधून, व्हिडिओ व्हायरल
हा शेतकरी चक्क अलिशान अशा Audi A4 गाडीमधून भाजी विकायला येतो. सुजित एसपी असे या शेतकऱ्याचे नाव असून, सोशल मीडियावर 'व्हरायटी फार्मर' नावाचे या नावाने त्याचे खाते आहे.
- Read in
- मराठी
सध्या केरळमधील एका शेतकऱ्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. येथे हा शेतकरी चक्क अलिशान अशा Audi A4 गाडीमधून भाजी विकायला येतो. सुजित एसपी असे या शेतकऱ्याचे नाव असून, सोशल मीडियावर 'व्हरायटी फार्मर' नावाचे या नावाने त्याचे खाते आहे. या खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे, ज्यामध्ये दिसत आहे की सुजित आपल्या शेतात भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. नंतर तो ऑडी A4 या गाडीतून हा भाजीपाला विकण्यासाठी बाजारात येतो. त्यानंतर तो जमिनीवर एक कापड अंथरून आपला भाजीपाला विकू लागतो. ज्या गाडीतून हा शेतकरी भाजी विकण्यासाठी येतो त्याची किंमत 44 लाखांपेक्षा जास्त आहे. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर फिरत आहे व नेटिझन्सनेही या शेतकऱ्याचे कौतुक केले आहे. (हेही वाचा: VIDEO: रेल्वे रुळावर उभे राहून रील बनवत होता तरुण; मागून ट्रेनने दिली धडक, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch))
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2023 11:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

