VIDEO: रेल्वे रुळावर उभे राहून रील बनवत होता तरुण; मागून ट्रेनने दिली धडक, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch)
फरमान रेल्वे रुळांवर बेपर्वाईने रील तयार करत असताना त्याला धावत्या ट्रेनने धडक दिली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
आजकाल सोशल मीडियाच्या युगात जवळजवळ प्रत्येकालाच खास व्हिडिओ बनवून अल्पावधीत लोकप्रियता मिळवायची आहे. यासाठी अनेक लोक हटके व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते व्हायरल होतील. काहीतरी नवीन करून पाहण्याच्या उदेशाने काही लोक धोकादायक स्टंट करताना दिसतात, तर काही लोक व्हिडिओ बनवण्यासाठी धोकादायक ठिकाणे निवडतात. आता असेच एक धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून समोर आले आहे. जहांगीराबादचा रहिवासी असलेला एक तरुण रील बनवण्याच्या नादात आपला जीव गमावून बसला आहे. फरमान असे या तरुणाचे नाव असून तो 14 वर्षांचा होता.
फरमान रेल्वे रुळांवर बेपर्वाईने रील तयार करत असताना त्याला धावत्या ट्रेनने धडक दिली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. सध्या या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अहवालानुसार, फरमान आपल्या 3 मित्रांसह मिरवणूक पाहण्यासाठी जात होता. मात्र, मध्येच त्याने रेल्वे क्रॉसिंगजवळ थांबून रुळावर रील बनवण्याचा विचार केला. त्याच्या मित्रांनीही त्याचे म्हणणे मान्य केले. त्यानंतर काहीही विचार न करता फरमान रेल्वे रुळावर जाऊन उभा राहिला व त्याचवेळी ट्रेनने त्याला धडक दिली. (हेही वाचा: नोएडात ट्रक मध्ये घुसला अजगर; चालक, सहचालक ट्रक सोडून पळाले (Watch Video)
हा व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतो-
tw // disturbing
Barabanki: A teenager Farmaan (14) who was purportedly making a video for Instagram reels along the railway tracks was kiIIed when he was struck by a running train. pic.twitter.com/Ysxl895ABD
— زماں (@Delhiite_) September 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2023 06:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

