Karnataka Shocker: विद्यार्थिनीने नाकारला प्रेमाचा प्रस्ताव; माथेफिरू तरुणाने कॉलेज कॅम्पसमध्येच भरदिवसा केली तरुणीची हत्या
असे सांगण्यात येत आहे की, आरोपीने नेहाला प्रपोज केले होते, जे नेहाने नाकारले. याचा राग आल्याने फैयाजने भरदिवसा कॉलेज कॅम्पसमध्ये नेहाच्या मानेवर दोन्ही बाजूंनी वार करून तिची हत्या केली
Jilted Lover Stabs Girl to Death: कर्नाटकातील (Karnataka) हुबळी (Hubballi) येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका तरुणाने, मुलीने प्रेमास नकार दिला म्हणून तिची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत विद्यार्थिनीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्यानंतर गुन्हा करून घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले. सध्या पोलीस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे. आरोपी अनेक दिवसांपासून मुलीचा पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे. तसेच तो तिला त्रासही देत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळी येथे राहणारी पिडीत मुलगी नेहा हिरमट ही काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरमट यांची मुलगी होती. ती स्थानिक बीव्हीबी कॉलेजमध्ये एमसीएच्या वर्गात शिकत होती. बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथील रहिवासी असलेला आरोपी फैयाज हाही याच महाविद्यालयात शिकतो.
अहवालानुसार, फैयाज अनेक दिवस नेहाच्या मागे लागला होता. असे सांगण्यात येत आहे की, आरोपीने नेहाला प्रपोज केले होते, जे नेहाने नाकारले. याचा राग आल्याने फैयाजने भरदिवसा कॉलेज कॅम्पसमध्ये नेहाच्या मानेवर दोन्ही बाजूंनी वार करून तिची हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Delhi Shocker: लोकप्रिय यूट्यूबर Swati Godara ने पीजीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या; UPSC च्या तयारीसाठी आली होती दिल्लीला)
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा मुलगा भाजप नेते विजयेंद्र येडियुरप्पा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे की, ते म्हणाले, ‘एका भीषण घटनेत, काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची दिवसाढवळ्या फैयाजने हत्या केली. तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. काँग्रेस सत्तेत आल्यापासून महिलांच्या सुरक्षेची चर्चा निरर्थक ठरत आहे. महिलांवरील अत्याचार, खून यासारख्या गुन्ह्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. सिद्धरामय्या सरकार आपल्या बहिणी आणि मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे.’