Karnataka: लग्नाच्या रिसेप्शनवेळी मृत्यू झालेल्या मुलीचे पालकांनी केले अवयव दान
कर्नाटकातील एका पालकांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या रिसेप्शनवेळी तिचा मृत्यू झाल्याने मोठ्या धीराने तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
Karnataka: कर्नाटकातील एका पालकांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या रिसेप्शनवेळी तिचा मृत्यू झाल्याने मोठ्या धीराने तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे राज्यातील आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी स्वागत केले.(Delhi Building Collapse: दिल्लीत जेजे कॉलनी परिसरात इमारत कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय चित्रा ही रिसेप्शनवेळी तिला स्टेजवर भेटण्यासाठी येणाऱ्या पाहुणे मंडळींसोबत फोटो काढत होती. मात्र अचानक ती खाली कोसळली. त्यावेळी तातडीने तिच्या पालकांनी तिला NIMHNS रुग्णालयात नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिचा मेंदू चालणे बंद (Brain Dead) झाल्याचे सांगत तिला मृत घोषित केले.
कोलार जिल्ह्यातील श्रिनिवासपुर येथे ही घटना घडली आहे. चित्रा हिच्या पालकांना आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याने दु:ख झाले पण त्यांनी नंतर तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यावर चित्राच्या पालकांनी असे म्हटले की, तिच्यासाठी तो एक मोठा दिवस होता. पण नशीबात असे काही लिहिले होते की तिचा त्यावेळी मृत्यू झाला. तिच्या अवयवदानामुळे काही जणांचे आयुष्य बदलू शकते.(कर्नाटकातील हिजाब नंतर आता तमिळनाडूत धोतीवरुन वाद, मंदिरातील ड्रेस कोडवरुन मद्रास हायकोर्टाने केली 'ही' टिप्पणी)
याआधी खुशीनगर येथील 21 वर्षीय मुलगा प्रज्वल याचा अपघात झाल्यानंतर त्याचा सुद्धा ब्रेन डेड झाला. त्यामुळे त्याच्या पालकांनी प्रज्वल याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ही सुधाकर यांनी त्याच्या परिवाराचे आभार मानले होते.