कानपुर मध्ये Chhota Rajan, Munna Bajrangi यांच्या नावे पोस्टल तिकीट जाहीर, टपाल मास्टर यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण
कानपूर (Kanpur) मुख्य पोस्ट ऑफिसच्या बेजबाबदार कामाचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. येथून आंतरराष्ट्रीय माफिया छोटा राजन (Chhota Rajan) आणि बागपत जेल मध्ये गँगवार मध्ये मारण्यात आलेल्या मुन्ना बजरंगी (Munna Bajrangi) याचा फोटो असलेले पोस्टल तिकिट जाहीर करण्यात आले आहे.
कानपूर (Kanpur) मुख्य पोस्ट ऑफिसच्या बेजबाबदार कामाचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. येथून आंतरराष्ट्रीय माफिया छोटा राजन (Chhota Rajan) आणि बागपत जेल मध्ये गँगवार मध्ये मारण्यात आलेल्या मुन्ना बजरंगी (Munna Bajrangi) याचा फोटो असलेले पोस्टल तिकिट जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता प्रश्न उपस्थितीत केले जात असून पोस्ट मास्टर जनरल यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. पोस्ट मास्टर जनरल यांनी असे म्हटले की, त्यांना या प्रकरणाची माहिती नसून त्याची चौकशी केली जाणार आहे.(Mohammad Shahabuddin Met Family: तिहार जेलचा कैदी मोहम्मद शहाबुद्दीन तीन वर्षांनी कुटुंबीयांना भेटला; पत्नी, मुलांना पाहून झाला भावूक)
चीफ पोस्ट मास्टर हिंमांशू मिश्रा यांनी म्हटले की, टपाल विभाग आयडीसह एक फॉम जमा करुन My Stamp सुविधा देतात. आमच्या कर्मचाऱ्यांनी फोटोबद्दल तपासणी करायला पाहिजे होती.त्यांनी पुढे असे म्हटले की, माय स्टँम्प डाक योजना अंतर्गत आपले पोस्टल तिकिट बनवण्यासाठी व्यक्तीला स्वत: पोस्टात येणे आवश्यक आहे. तेथे वेबकॅमच्या मदतीने फोटो काढला जातो. आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर पोस्टल तिकिट दिले जाते. (Indore Double Murder: इंदूरमधील 'त्या' दुहेरी हत्येचे गूढ उकलले; प्रियकराच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीनेच केला आई-वडिलांचा खून)
खरंतर भारतात सरकारच्या माय स्टँम्प योजनेअंतर्गत 300 रुपये जमा करुन तुम्ही सुद्धा तुमचा किंवा नातेवाईकांचा फोटो असणारे 12 पोस्टल तिकिट जाहीर करु शकतात. केंद्र सरकारने माय स्टँम्प योजना 2017 मध्ये सुरु केली होती. ही योजना जागतिल फिलॅटली प्रदर्शनादरम्यान सुरु झाली होती. ही पोस्टल तिकिटे अन्य तिकिटांप्रमाणेच मान्य आहेत. तसेच अशा पद्धतीची तिकिटे लावून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पोस्टल तुम्ही पाठवू शकता.
खरंतर पोस्टल तिकिट बनवण्याची प्रक्रिया ही थोडी किचकट आहे. यामध्ये क्रॉस चेकिंग केल्यानंतर दोन माफिया डॉन यांच्या नावे तिकिटे जाहीर झाल्याने पोस्ट ऑफिसच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)