जम्मू-काश्मिर: जमात-ए-इस्लामी संबंधित संपत्ती सील, सरकारच्या कारवाईला मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून विरोध
जम्मू-काश्मिर (Jammu_Kashmir) मधील कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामी (Jamaat-e-Islami) वर बंदी घालण्यात आल्याने पूर्व मुख्यमंत्री आणि पीडीपी नेता मेहबूबा मुफ्तीमुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी सरकारविरुद्ध कारवाईला विरोध केला आहे.
जम्मू-काश्मिर (Jammu_Kashmir) मधील कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामी (Jamaat-e-Islami) वर बंदी घालण्यात आल्याने पूर्व मुख्यमंत्री आणि पीडीपी नेता मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी सरकारविरुद्ध कारवाईला विरोध केला आहे. तसेच केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामी संघटनेवर 5 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत काश्मिर संघटनेशी जोडली गेलेली काही संपत्तीसुद्धा सरकारकडून सील करण्यात आली आहे. शुक्रवारी दक्षिण काश्मिरमध्ये काही ठिकाणी छापे मारण्यात आले. त्यामुळे सुरक्षाबळाने या संघटनेशी संबंधत दोन डजन पेक्षा अधिक सदस्यांना अटक केली. सरकारने देश विरोधी आणि विध्वंसक कारणासोबत संबंध असल्यामुळे अलगाववादी समूह जमात-ए-इस्लामी विरुद्ध गुरुवारी बंदी घालण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जमात-ए-इस्लामीच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांच्या घरासह अन्य काही संपत्ती शुक्रवारी रात्री शहर आणि घाटीमधील काही ठिकाणी सील करण्यात आली आहे. त्याचसोबत जमात-ए-इस्लामी संघटनेच्या नेत्यांचे बँक खाते ही सील करण्यात आलेले आहे.(हेही वाचा-भारतीय लष्कराच्या अन्नात विष मिसळण्याचा ISI चा कट; गुप्तचर यंत्रणांनी दिली माहिती, हाय अलर्ट लागू)
जमात-ए-इस्लामीसाठी सरकार विरुद्ध मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्वीट मधून सरकारवर टीका केली. तसेच जमात-ए-इस्लामसाठी भारत सरकारची एवढे असुविधाजनक नाही आहे.काश्मिरींसाठी अथक परिश्रम करणाऱ्या संघटननेवर सरकारने प्रतिबंध लावण्यात आले आहे.
जमात-ए-इस्लामी काय आहे?
जमात-ए-इस्लामी एक इस्लामिक संघटना आहे. ज्याची स्थापनी 1941 रोजी मौलाना अबुल आला मौदूदी यांनी खुदाची सल्तनत करण्यासाठी प्रस्थापित केली होती. त्यांनी इस्लाम धर्माच्या मार्गाने राजकीय विचारधारणा प्रदान करण्याच्या रुपाने ही संघटना बनवण्यात आली होती. जमात-ए-इस्लाम यांचे तीन गट आहेत. जमात-ए-इस्लामी हिंद, जमात-ए-इस्लामी-पाकिस्तान आणि जमात-ए-इस्लामी काश्मिर, जमात-ए-इस्लामी हिंद सोडून अन्य दोन गट दहशतवादी संघटने संबंधित आहेत.
मात्र जमात-ए-इस्लामी यांच्या विरुद्ध प्रथमच मोठी कारवाई करण्यात आली आहे. संघटनेवर पूर्व भागातील दहशतवादी संघटन हिजबुल मुजाहिद्दीनच्या राजकीय शाखेच्या अंतर्गत काम करण्याचा आरोप लावण्यात आला. मात्र संघटनेने नेहमी स्वत:ला एक सामाजिक आणि धार्मिक संघटना असल्याचे सांगितले आहे. जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मिर मध्ये देश विरोधी आणि विध्वंसकारी कामात संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.