लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तान्हाजी चित्रपट करमुक्त झाल्याची घोषणा करतील- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात; 15 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आज महाराष्ट्रासह देशभरात मकर संक्रांत, उत्तरायण, पोंगल सणाचा उत्साह आहे. नागरिकांसह देशातील कलाकार आणि राजकीय मंडळींनी या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

16 Jan, 03:56 (IST)

उत्तर प्रदेश आणि हरयाणा या दोन्ही राज्यांनी तान्हाजी (Tanhaji) चित्रपट  करमुक्त केला आहे. यामुळे तान्हाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रातही (Maharashtra) हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी मागणी केलेले पत्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केले होते. यानंतर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तान्हाजी चित्रपट करमुक्त झाल्याची घोषणा करतील, असे ट्विट काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे.

बाळासाहेब थोरात यांचे ट्वीट-

 

16 Jan, 03:19 (IST)

नागरिकत्व दुरूस्ती कायदा संपूर्ण देशात लागू झाला असून तरीदेखील अनेक राज्यातून या कायद्याला विरोध दर्शवला जात आहे. परंतु, या कायद्यामुळे देशातील कोणत्याच नागरिकांच्या नागरिकत्वला धक्का बसणार नाही, असे केद्र सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. यातच भाजप नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री एम. एल खट्टर यांनी आज नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे.

 

एएनआयचे ट्वीट-

 

16 Jan, 02:49 (IST)

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने राजकाणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. पुणे येथील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी सर्वांचे लक्ष आकर्षित करुन घेतले आहे. दरम्यान संजय राऊत म्हणाले की, एक काळ असा होता की दाऊद इब्राहिम, छोटा शकील, शरद शेट्टी हे मुंबईचे पोलिस आयुक्त कोण असणार? आणि मंत्रालयात कोण बसणार? हे ठरवायचे. तसेच दिवंगत काँग्रेस नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीन लाल यांची भेट घ्यायच्या, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

एएनआयचे ट्वीट-

 

 

16 Jan, 01:29 (IST)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र. अजय देवगण स्टारर फिल्म ‘तान्हाजी’ राज्यात करमुक्त करण्याची केली मागणी. याआधी उत्तरप्रदेश येथे हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

16 Jan, 24:50 (IST)

वेतन पुनरीक्षण चर्चा  फिसकटल्यानंतर इंडियन बँक असोसिएशनने (IBA) ने या महिन्यात दुसऱ्यांदा बँक संप पुकारला आहे. आयबीएने 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी बँक संप पुकारला आहे. यापूर्वी 8 जानेवारीच्या संपात 6 बँक कर्मचारी संघटनांनीही भारत बंदमध्ये भाग घेतला होता. यावेळचा हा संप खास असणार आहे कारण 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

 

16 Jan, 24:10 (IST)

सिंचन घोटाळयाप्रकरणी अजित पवार यांच्या डोक्यावरील टांगती तलवार तशीच कायम राहणार आहे. न्यायालयाने आज कोणताही निर्णय दिला नाही त्यामुळे तूर्त तरी सिंचन घोटाळयाबाबत सर्व चौकशी तशीच सुरु राहणार आहे. 13 फेब्रुवारी रोजी याबाबत पुढील सुनावणी पार पडेल. 

15 Jan, 23:20 (IST)

2012 Delhi Gangrape Case: निर्भया खटल्याबाबत कोर्टाची राज्याला नोटीस, उद्या दुपारी अडीच वाजता पार पडणार सुनावणी;  पीडित मुलीच्या पालकांकडूनही कोर्टाने मागितले उत्तर

15 Jan, 22:15 (IST)

इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झारीफ 3 दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज त्यांनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीची भेट घेतली आहे.

15 Jan, 21:58 (IST)

PMC Bank Scam मधील खातेदारांचे पैसे लवकरात लवकर मोकळे करण्यासाठी जलद वसुलीच्या बाबतीत देखरेख करण्यासाठी तीन सदस्य समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये माजी न्यायाधीश राधाकृष्णन या समितीचे अध्यक्ष असतील.

15 Jan, 21:05 (IST)

मुंबईमध्ये राजभवनजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जमिनीवर बांधा अशी मागणी सरकारकडे मराठा समाज सेवा संघने केली आहे. तर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी विनाकारण जागेवरून वाद सुरू असल्याचं मत आहे. 

15 Jan, 20:41 (IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 100 फूटांनी वाढवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान येत्या 8 दिवसांत परवानगी मिळेल. तसेच यामध्ये चवदार तळ्यांची प्रतिकृती बनवली जाणार आहे. 

 

15 Jan, 20:32 (IST)

2017 साली बॉलिवूड अभिनेत्रीच्या  विनयभंगाच्या तक्रारीनंतर आरोपी विकास सचदेव याला दिंडोशी कोर्टाने दोषी ठरवले आहे.  POCSO कायद्याच्या कलम 354 नुसार ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

15 Jan, 19:50 (IST)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे निष्कपट व्यक्ती आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काही कठोर निर्णय घ्यायला हवेत. तर, राहुल गांधी यांनी पंधरा ते सतरा तास पक्ष कार्यालयात बसून पक्षाचे काम करायला हवे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. एका प्रसारमाध्यम समुहाच्या  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

15 Jan, 18:52 (IST)

ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट वर 22 किमी लांबीचा मार्ग असून 6 लेन असतील मुंबई, नवी मुंबई येथून पुढे जेएनपीटी बंदर आणि मुंबई पुणे महामार्गाला जोडला जाणार आहे. आज मुंबई मधील शिवडीमध्ये या प्रकल्पाच्या शुभारंभाचा सोहळा पार पडला.  जाणून घ्या प्रोजेक्टची वैशिष्टे.  

15 Jan, 18:34 (IST)

आज लष्कर दिनानिमित्त बोलताना  लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी जम्मू कश्मिर मधून कलम 370 हटवणं हा 'ऐतिहासिक' निर्णय असल्याचं म्हटलं आहे. सोबतच यावेळी त्यांनी भविष्यातील धोरणांची देखील माहिती दिली. 

 

15 Jan, 17:43 (IST)

आज (15 जानेवारी) महाराष्ट्रासह देशभरात मकर संक्रांतीचा आनंद लूटत आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील पतंगबाजीचा आनंद लुटला आहे.

15 Jan, 17:18 (IST)

आज (15 जानेवारी)  वसई-विरार मनपा परिवहन कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन  पुकारले आहे. पगार रखडल्याने कर्मचार्‍यांनी कामाबंद आंदोलनाचा बडगा उचलला आहे. दरम्यान यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. 

15 Jan, 16:26 (IST)

दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भेटीला पोहचले आहेत.

15 Jan, 16:16 (IST)

दिल्लीमध्ये आज 72 व्या सैन्य दिनानिमित्त लष्कराच्या परेडला दिमाखात सुरूवात झाली आहे. आज कॅप्टन तानिया शेरगिल ही परेडचं संचलन करणारी पहिली महिला ठरली आहे.

15 Jan, 15:55 (IST)

मुंबई शहराला रायगडशी जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प 'मुंबई- पारबंदर' याची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. हा देशातील सर्वात लांब समुद्रावरील पूल असणार आहे. ट्रान्स हार्बर लिंकच्या पहिल्या गर्डरचं काम आजपासून सुरू होईल.   

Read more


नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदा लीप इयर असल्याने 15 जानेवारी दिवशी महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहाने या सणाचं स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांत तर तमिळनाडू मध्ये आज पोंगल सणाचा उत्साह आहे.गुजरात मध्ये उत्तरायण साजरा केला जात आहे. आज तीळगुळ वाटून महाराष्ट्रात जशी गोडाधोडाच्या पदार्थांचा आस्वाद घेत नववर्षाच्या पहिल्या सणाची सुरूवात केली जाते. तशी गुजरातमध्ये यंदा उत्तरायणाच्या धामधूमीमध्ये पतंगबाजीचा उत्साह आहे. गुजरात मध्ये उत्तरायणाच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी पतंगबाजीचा आनंद लुटला. केवाडिया येथील सरोवर धरणाजवळ असलेल्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' जवळ पतंगबाजीचा आनंद लुटला.

तमिळनाडूमध्येही आज जलिकट्टू या बैलाच्या शर्यतीचा थरारक रंगत आहे. मदुराई सह तमिळनाडूच्या अनेक शहरांमध्ये या वार्षिक बैलांच्या शर्यतीचा सण रंगला. Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पतंगबाजीचा आनंद लूटताना दिसले. मग आज मकर संकर संक्रांतीच्या सणासोबतच एकमेकांना तिळगूळ वाटून रूसवे फुसवे सोडून नव्याने सुरूवात करा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now